IPL 2022 Delhi Capitals Squad: अशी आहे 'नवी दिल्ली'

IPL 2022 Rishabh Pant Delhi Capitals Squad
IPL 2022 Rishabh Pant Delhi Capitals SquadSakal
Updated on

IPL 2022 Rishabh Pant Delhi Capitals Squad : आयपीएलच्या 15 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा पहिल्यांदा जेतेपद मिळवण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरेल. मजबूत संघ बांधणी करताना दिल्लीनं 7 परदेशी खेळाडूंसह 17 भारतीय खेळाडूंवर बोली लावली. पाँटिंगच्या रणनितीचा एक भाग म्हणून डेविड वॉर्नर दिल्लीच्या ताफ्यात आला. तोच डावाची सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे. परदेशी खेळाडूंमध्ये त्यांनी वॉर्नरसाठीच मोठी रक्कम पर्समधून काढली. सर्वात महागडा खेळाडू घेताना त्यांनी भारतीयाला पसंती दिली.

गोलंदाजी कोट्यातील शार्दुल ठाकूरला त्यांनी मोठी बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं. तो गोलंदाजीसह चांगली फटकेबाजीही करु शकतो. त्यामुळे त्यांना हा सौदा चांगलाच फायद्याचा ठरु शकतो. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने कॅप्टन रिषभ पंतसह अक्षर पटेल आणि पृथ्वी शॉ या भारतीय युवा खेळाडूंवर भरवसा दाखवला होता. तर परदेशी खेळाडूंमध्ये अर्निच नॉर्तजेवर त्यांनी विश्वास दाखवला होता.

IPL 2022 Rishabh Pant Delhi Capitals Squad
IPL 2022 Auction: रहाणेला मिळणार पुन्हा कर्णधारपद? जान्हवीने दिली हिंट

Delhi Capitals चे रिटेनर

रिषभ पंत (16 कोटी)

अक्षर पटेल (9 कोटी)

पृथ्वी शॉ (7 कोटी 50 लाख)

अर्निच नॉर्तजे (6 कोटी 50 लाख)

IPL 2022 Rishabh Pant Delhi Capitals Squad
IPL Auction : गुजरातमुळे Arjun Tendulkar ला 10 लाखाची लॉटरी!

दिल्ली कॅपिटल्सनं लिलावात कोणत्या खेळाडूसाठी किती रुपये खर्च केले

डेविड वॉर्नर (David Warner) Overseas Batsman ₹6,25,00,000

मिचेल मार्श (Mitchell Marsh) Overseas All-Rounder ₹6,50,00,000

मुस्तफीझुर रहमान (Mustafizur Rahman) Overseas Bowler ₹2,00,00,000

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) Indian Bowler ₹10,75,00,000

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) Indian Bowler ₹2,00,00,000

अश्विन हेब्बार (Ashwin Hebbar) Indian Batsman ₹20,00,000

सरफराज खान (Sarfaraz Khan) Indian All-Rounder ₹20,00,000

कमलेश नागरकोटी (Kamlesh Nagarkoti) Indian All Rounder ₹1,10,00,000

केएस भरत (K.S. Bharat) Indian Wicket Keeper ₹2,00,00,000

मनदीप सिंग (Mandeep Singh) Indian Batsman ₹1,10,00,000

सय्यद खलील अहमद (Syed Khaleel Ahmed) Indian Bowler ₹5,25,00,000

लुंगी एनिग्डी (Lungisani Ngidi) Overseas Bowler ₹50,00,000

चेतन सकारिया (Chetan Sakariya) Indian Bowler ₹4,20,00,000

यश धूल (Yash Dhull) Indian All-Rounder ₹50,00,000

विक्की ओस्तवाल (Vicky Ostwal) Indian All-Rounder ₹20,00,000

रिपल पटेल (Ripal Patel) Indian All-Rounder ₹20,00,000

ललित यादव (Lalit Yadav) Indian All-Rounder ₹65,00,000

रावमन पॉवेल (Rovman Powell) Overseas Batsman ₹2,80,00,000

टीम सेफर्ट (Tim Seifert) Overseas Wicket Keeper ₹50,00,000

प्रविण दुबे (Pravin Dubey) Indian All-Rounder ₹50,00,000

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com