MI हार्दिक पांड्यासोबत अशी का वागली? रोहित म्हणाला...

Rohit Sharma And Hardik Pandya
Rohit Sharma And Hardik PandyaSakal

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) नव्या हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होत आहे. आयपीएलचा 15 व्या हंगामात दमदार कामगिरी करण्यासाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) स्पर्धेला सुरुवात होण्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर भाष्य केले. सध्याच्या घडीला संघात अनेक मॅच विनर असल्याचेही त्याने सांगितले. यावेळी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) रिटेन का केले नाही असा प्रश्नही त्याला (Rohit Sharma) विचारण्यात आला. यावर त्याने यामागचे कारण सांगितले.

रोहित म्हणाला की, हार्दिक पांडया आमच्या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू होता. त्याने संघाला दिलेले योगदान हे अविस्मरणीय असेच आहे. संघाने जी कामगिरी करुन दाखवली आहे. यात हार्दिक पांड्याचाही मोलाचा वाटा राहिला आहे. पण आणखी काही खेळाडूही होते. ज्यांनी त्याच्याप्रमाणेच संघासाठी बहुमूल्य कामगिरी केल. त्यांच्याविषयी अधिक बोलले गेले नाही तरी त्यांच्याकडे लक्ष देणंही गरजेच होते, असे रोहित शर्मा म्हणाला. हार्दिकपेक्षा सुर्यकुमार आणि इशान किशन संघासाठी महत्त्वपूर्ण होता, हेच यातून स्पष्ट केले.

Rohit Sharma And Hardik Pandya
नदाल कोर्टपासून दूर; सहा आठवड्यांचा ब्रेक घेण्याची नामुष्की

आता हार्दिकसमोर नवं आव्हान असेल

रोहित पुढे म्हणाला की, आता हार्दिक पांड्या केवळ खेळाडू म्हणून नाही तर कॅप्टनच्या रुपात मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्यासमोर मोठे आव्हान असेल. जोपर्यंत तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता तोपर्यंत त्याने दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली, असा उल्लेखही रोहित शर्मान न चुकता केला.

Rohit Sharma And Hardik Pandya
IPL 2022 : पाकमुळे शाहरुखच्या KKR ला स्पर्धेआधी मोठा धक्का

मुंबईच्या नव्या संघाबाबत काय म्हणाला रोहित

यंदाच्या हंगामातील बरेच सामने हे मुंबईच्या मैदानात होणार आहेत. याचा मुंबईला किती फायदा होईल? असा प्रश्नही रोहितला विचारण्यात आला होता. यावर रोहित म्हणाला की, नव्या हंगामात टीम नवीन आहे. इशान किशन, जसप्रित बुमराह आणि सुर्या सोडून अन्य खेळाडू इथं फारसे खेळलेले नाहीत. त्यामुळे घरच्या मैदानाचा टीमला अधिक फायदा होईल, असे वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com