RCB vs CSK : आरसीबीचा विजय; चेन्नईच्या प्ले ऑफची आशा मावळली | IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings

RCB vs CSK : आरसीबीचा विजय; चेन्नईच्या प्ले ऑफची आशा मावळली

पुणे : रॉयल चॅलेंजर बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्जचा 13 धावांनी पराभव करत चेन्नईच्या प्ले ऑफच्या स्वप्नांवर जवळपास पाणी फिरवले. आरसीबीने ठेवलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला 160 धावांपर्यंतच मजल मराता आली. चेन्नईकडून डेवॉन कॉनवॉयने 56 धावांची झुंजार खेळी करत प्रतिकार केला. मात्र आरसीबीच्या फिरकी आणि वेगावान गोलंदाजांनी भेदक मारा करत सीएसकेला सातत्याने धक्के दिले. हर्षल पटेलने चांगला मारा करत 3 विकेट घेतल्या. आरसीबीकडून महिपाल लोमरोरने सर्वाधिक 42 तर कर्णधार फाफ ड्युप्लेसिसिने 38 धावा केल्या. त्यांना दिनेश कार्तिकने 17 चेंडूत 26 धावा चोपून चांगली साथ दिली.

पाहा हायलाईट्स

आरसीबीने चेन्नईचा केला 13 धावांनी पराभव

135-7 : हेजलवूडने धोनीचा केला अडसर दूर

धावा आणि चेंडूमधील अंतर वाढत असतानाच जॉश हेजलवूडने महेंद्रसिंह धोनीला 3 धावांवर बाद करत चेन्नईच्या चेसमधील हवा काढून घेतली.

133-6 : हर्षल पटेलने सीएसकेला दिला मोठा धक्का

हर्षल पटेलने चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का दिला. त्याने 27 चेंडूत 34 धावा करणाऱ्या मोईन अलीला बाद करत धोनीला एकटे पाडले.

122-5 : जडेजा 3 धावांची भर घालून परतला

109-4 : हसरंगाने दिला मोठा धक्का 

चेन्नईच्या फलंदाजीला गळती लागली असताना एका बाजूने चिवट फलंदाजी करत डेवॉन कॉनवॉयने अर्धशतक ठोकले होते. मात्र 37 चेंडूत 56 धावा करणाऱ्या कॉनवॉयला हसरंगाने 15 व्या षटकात बाद करत मोठा धक्का दिला.

75-3 : मॅक्सवेलचा सीएसकेला अजून एक धक्का

मॅक्सवेलने रॉबिन उथप्पाची शिकार केल्यानंतर सीएसकेचा अव्वल फलंदाज अंबाती रायुडूला देखील 10 धावांवर माघारी धाडून चेन्नईला अजून एक मोठा धक्का दिला.

59-2 : रॉबिन उथप्पाने केली निराशा

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर आलेल्या रॉबिन उथप्पाने निराशा केली. तो अवघ्या 1 धावेवर मॅक्सवेलची शिकार झाला.

54-1 : ऋतुराज बाद 

आरसीबीच्या 173 धावांचा पाठलाग करताना सीएसकेच्या ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवॉय यांनी चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पॉवर प्लेनंतर शाहबाज अहमदने ऋतुराजला 28 धावांवर बाद केले.

दिनेश कार्तिकचा शेवटच्या षटकात जलवा

दिनेश कार्तिकने प्रेटोरियस टाकत असलेल्या शेवटच्या षटकात 16 धावा चोपून आरसीबीला 173 धावांपर्यंत पोहचवले. त्याने 17 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.

157-7 : स्लॉग ओव्हरमध्ये आरसीबीची घसरगुंडी

सीएसकेच्या तिक्षाणाने स्लॉग ओव्हरमध्ये आरसीबीला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने वानिंदू हसरंगा (0) आणि शाहबाज अहमदला (1) एकाच षटकात बाद केले.

123-4 : रजत पाटीदार देखील बाद 

विराट बाद झाल्यानंतर 15 चेंडूत 21 धावा करणाऱ्या पाटीदार आणि लोमरोरने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न प्रेटोरियसने हाणून पाडला. दरम्यान, मुकेश चौधरीने अप्रतिम झेल पकडला.

79-3 : मोईन अलीने उडवला विराटचा त्रिफळा

मोईन अलीने विराट कोहलीला चांगलेच दमवले. मोईन अलीला खेळताना विराट कोहली चाचपडताना दिसला. अखेर विराटची 33 चेंडूतील 30 धावांची खेळी त्याने संपवली.

76-2 : विराट - मॅक्सवेलमध्ये झाला गोंधळ

विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात धाव घेताना गोंधळ झाला. याचा परिणाम म्हणजे मॅक्सवेल 3 धावांवर धावबाद झाला.

62-1 : मोईन अलीने दिला धक्का

दुखापतीनंतर संघात परतलेल्या मोईन अलीने आरसीबीला मोठा धक्का दिला. त्याने सेट झालेल्या फाफ ड्युप्लेसिसला 38 धावांवर बाद केले.

आरसीबीच्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद 57 धावा

आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 57 धावा केल्या.

मोईन अली परतला.

चेन्नईने आपल्या संघात एक बदल केला आहे. मोईन अली मिशेल सँटनरच्या जागी संघात परतला आहे. तो दुखापतीमुळे काही सामने खेळला नव्हता.

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकली

चेन्नईने नाणेफेक जिंकून चेस करण्याचा निर्णय घेतला आहे.