GT vs RCB : कोहलीची विराट खेळी; आरसीबी पोहचली चौथ्या स्थानावर

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titansesakal

मुंबई : विराट कोहलीने मोठ्या सामन्यात मोठी खेळी करत आरसीबीला मस्ट विन सामन्यात विजयी मार्गावर नेले. विराटच्या 73 धावांच्या जोरावर आरसीबीने गुजरातचे 169 धावांचे आव्हान 8 गडी राखून पार केले. गुजरातकडून राशिदने दोन विकेट घेतल्या. तर फाफ ड्युप्लेसिसने 44 धावांचे योगदान दिले. तर ग्लेन मॅक्सवेलने 18 चेंडूत नाबाद 40 धावा चोपल्या. गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार 62 धावा केल्या. आरसीबी या विजयानंतर गुणतालिकेत 16 गुण मिळवत चौथ्या स्थानावर पोहचली आहे.

Highlights

मॅक्सवेलची तुफान खेळी, आरसीबीने सामना 8 गडी राखून जिंकला.

विराट कोहली बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत आरसीबीच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने 18 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी केली.

146-2 : विराट कोहलीची दमदार खेळी संपली

विराट कोहलीने 73 धावांची दमदार खेळी केली. मात्र त्याची ही 73 धावांची खेळी राशिद खानने संपवली.

115-1 : फाफ ड्युप्लेसिसचे अर्धशतक हुकले

विराट कोहलीबरोबर 115 धावांची सलामी देणाऱ्या फाफ ड्युप्लेसिसला राशिद खानने 44 धावांवर बाद केले.

विराट कोहलीचे झुंजार अर्धशतक 

विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात आपला खेळ उंचावत अर्धशतक ठोकले. त्याने 33 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्याने ड्युप्लेसिसच्या साथीने आरसीबीला नाबाद शतकी सलामी करून दिली.

विराट कोहली - फाफ ड्युप्लेसिसची दमदार सलामी

गुजरातचे 169 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसिसने दमदार सलामी दिली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये आरसीबीला 55 धावांपर्यंत पोहचवले. यात विराटचा 34 धावांचा वाटा होता.

राशिद खानची फटकेबाजी, हार्दिकचे अर्धशतक हैदराबादच्या 168 धावा

राशिद खानने 6 चेंडूत 19 धावा चोपून गुजरातला 168 धावांपर्यंत पोहचवले. दुसऱ्या बाजूला कर्णधार हार्दिक पांड्याने 47 चेंडूत नाबाद 62 धावांची खेळी केली.

132-5 : तेवतिया 2 धावा करून बाद 

हार्दिकचे दमदार अर्धशतक

123-4 : डेव्हिड मिलर 34 धावांची भर घालून परतला

हार्दिक पांड्या - डेव्हिड मिलर यांची अर्धशतकी भागीदारी

गुजरातच्या स्वस्तात तीन विकेट गेल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली.

62-3 : वृद्धीमान साहा बाद 

सलामीला आलेल्या वृद्धीमान साहाने 22 चेंडूत 31 धावांची खेळी केली. मात्र फाफ ड्युप्लेसिसने त्याला धावबाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला.

38-2 : मॅथ्यू वेड पुन्हा स्वस्तात माघारी

यंदाच्या आयपीएलमध्ये मॅथ्यू वेडला फार मोठी खेळी करता आलेली नाही. आजच्या आरसीबी विरूद्धच्या सामन्यात देखील तो 13 चेंडूत 16 धावा करून ग्लेन मॅक्सेवलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

21-1 : गुजरातला पहिला धक्का

गुजरात टायटन्सला जॉस हेजलवूडने पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर शुभमन गिलला अवघ्या 1 धावेवर बाद केले.

गुजरातचा फलंदाजीचा निर्णय 

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघात एक एक बदल करण्यात आले आहेत. आरसीबीने सिराजच्या जागेवर सिद्धार्थ कौलला संधी दिली आहे. तर गुजरातमध्ये अल्झारी जोसेफच्या जागी लॉकी फर्ग्युसन संघात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com