Video : केनच्या सुपर कॅचवर काव्या झाली फिदा! |SRH vsLSG |IPL 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kaviya Maran Reaction On Kane Williamson Catch

Video : केनच्या सुपर कॅचवर काव्या झाली फिदा!

IPL 2022, SRH vs LSG : मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर लखनौ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात रंगलेल्या सामन्यात केन विल्यमसनने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून दिला. या सामन्यात नाणेफेक जिंकून त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमारने पहिले षटक टाकले. त्यानंतर केन विल्यमसनने (Kane Williamson) मोठा डाव टाकला. त्याने पॉवर प्लेमध्ये दुसऱ्या षटकातच चेंडू वॉशिंग्टन सुंदरच्या हाती सोपवला.

युवा फिरकीपटूनंही त्याचा विश्वास सार्थ ठरवला. आपल्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने लखनौचा सलामीवीर डी कॉकला (Quinton de Kock) आपल्या जाळ्यात अडकवले. विशेष म्हणजे हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने त्याचा सुंदर झेल टिपला. केन विल्यमसनने घेतलेला कॅच पाहून व्हीआयपी स्टँडमध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थितीत असलेली काव्या मारनच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: पराभवाच्या हॅटट्रिकनंतर CSK चाहत्यांना रैनाची आठवण; म्हणे...

सनरायझर्स हैदराबादची मालकीण असलेली काव्या मारन हैदराबादच्या प्रत्येक सामन्याला हजेरी लावत असते. स्टेडियममधील तिची झलक पाहण्याजोगी असते. आपल्या हवभावातून ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. केन विल्यमसन याने कॅच घेतल्यानंतर कॅमेरा तिच्याकडे वळला. तिची रिअॅक्शन बघण्यासारखी होती.

हेही वाचा: VIDEO : 'आल्यापासून तू माझ्यावर दबाव टाकतो आहेस'; बटलरची चहलविरूद्ध तक्रार

वॉशिंग्टनने एविन लुईसच्या रुपात संघाला दुसरे यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूला रोमारिओने मनिष पांडेला चालते करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. लखौनं पहिल्या पाच षटकात आघाडीचे तीन गडी गमावले होते.

Web Title: Ipl 2022 Srh Vs Lsg Kane Williamson Super Catch Of Quinton De Kock See Kaviya Maran Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..