SRH vs CSK : चौधरीचा चौका अन् सीएसकेचा तिसरा विजय | IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings

SRH vs CSK : चौधरीचा चौका अन् सीएसकेचा तिसरा विजय

पुणे : चेन्नईचा कर्णधार बदलला अन् संघ विजयी ट्रॅकवर परतला. चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादचा 13 धावांनी पराभव करत हंगामातील आपला तिसरा विजय मिळवला. सीएसकेचे 203 धावांचे आव्हान हैदराबादला पेलवले नाही. त्यांना 20 षटकात 6 बाद 189 धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादकडून निकोलस पूरनने आक्रमक फलंदाजी करत 64 धावा केल्या. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 4 बळी टिपले. तर फलंदाजीत ऋतुराज गायकवाडने 99 तर डेव्हॉन कॉनवॉयने 85 धावा केल्या.

पाहा Highlights

153-6 : सुंदरही 2 धावा करून फिरला माघारी

151-5 : हैदराबादचा निम्मा संघ गारद 

18 व्या षटकात सीएसकेने आपले दीडशतक पार केले होते. मात्र मुकेश चौधरीने शशांक सिंहला 15 धावांवर बाद करत हैदराबादला पाचवा धक्का दिला.

126-4 : हैदराबादला प्रेटोरियसला दिला मोठा धक्का

सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन चेन्नईच्या 202 धावांचा पाठलाग करताना दमदार फलंदाजी करत होता. मात्र प्रेटोरियसने त्याची ही 37 चेंडूत केलेली 47 धावांची खेळी 15 व्या षटकात संपवली.

88-3 : सँटनरने केले माक्ररमला बाद 

58-2 : चांगल्या सुरूवातीनंतर सीएसकेला दोन धक्के

चेन्नईने 203 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी दमदार सुरूवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर मुकेश चौधरीने हैदराबादला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने अभिषेक शर्माला 39 धावांवर तर राहुल त्रिपाठीला शुन्यावर बाद केले.

202-2 (20 Ov) : धोनी एक चौकार मारून बाद; सीएसकेच्या 20 षटकात 2 बाद 202 धावा 

182-1 : ऋतुराज गायकवाडचे दमदार शतक अवघ्या 1 धावने हुकले.

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने दमदार शतक ठोकणार असे वाटत असतानाच टी नटराजनच्या चेंडूवर 99 धावांवर झेलबाद केले.

ऋतुराजनंतर कॉनवॉयचेही अर्धशतक 

आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या डेव्हॉन कॉनवॉयने सावध फलंदाजी करत अर्धशतक ठोकले.

ऋतुराज-कॉनवॉयची शतकी सलामी, सीएसकेची धडाकेबाज सुरूवात

ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवॉय यांनी सीएसकेला दमदार सुरूवात केली. या दोघांनी 11 व्या षटकात सीएसकेचे शतक धावफलकावर लावले.

ऋतुराज गायकवाडचे दमदार अर्धशतक

CSK 40-0 : चेन्नईच्या सलामीवीरांची आश्वासक सुरूवात

चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्होन कॉनवॉयने संघाला आश्वास सुरूवात केली. त्यांनी सीएसकेला पॉवर प्लेमध्ये 40 धावांपर्यंत मजल मारून दिली.

चेन्नईच्या संघात बदल

कर्णधार बदल्यानंतर चेन्नईने संघात देखील बदल केले आहे. चेन्नईने ब्राव्हो आणि शिवम दुबेला वगळून डेव्हॉन आणि समरजीत सिंह यांना संधी दिली आहे.

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

Web Title: Ipl 2022 Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings 46th Match Live Cricket Score Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top