SRH vs PBKS : लिव्हिंगस्टोनची आक्रमक फलंदाजी, पंजाबची विजयाने सांगता| IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Punjab Kings | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Sunrisers Hyderabad vs Punjab Kings

SRH vs PBKS : लिव्हिंगस्टोनची आक्रमक फलंदाजी, पंजाबची विजयाने सांगता

मुंबई : पंजाब किंग्जने सनराईजर्स हैदराबादचे 158 धावांचे आव्हान 15.1 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यातच पार करत यंदाच्या आयपीएल हंगामातील आपला शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला. पंजाबकडून लिम लिव्हिंगस्टोनने 22 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. तर शिखर धवनने 39 धावांचे योगदान दिले. हैदराबादकडून फझलहक फारूकीने 2 विकेट घेतल्या. तत्पूर्वी हैदराबादकडून अभिषेक शर्माने 43 तर वॉशिंग्टन सुंदरने 25 आणि रोमरियो शेफर्डने नाबाद 26 धावा केल्या. पंजाबकडून नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

Highlights

लिव्हिंगस्टोनची आक्रमक फलंदाजी

लिम लिव्हिंगस्टोनने 22 चेंडूत 49 धावांची खेळी करत पंजाबला 16 व्या षटकातच सामना जिंकून दिला.

जगजीशा सुचितने 7 चेंडूत आक्रमक 19 धावा करणाऱ्या जितेश शर्माला बाद करत पंजाबला पाचवा धक्का दिला.

112-4 : शिखर धवनची झुंजार खेळी फारूकीने संपवली

पंजाब किंग्जचा डाव सारवून धरणाऱ्या शिखर धवनने 32 चेंडूत 39 धावांची खेळी केली. मात्र ही खेळी फारूकीने 13 व्या षटकात संपवली.

71-3 : मयांक अग्रवाल 1 धावेची भर घालून परतला

पंजाब किंग्जचा कर्णधार मयांक अग्रवालला वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 1 धावेवर बाद करत मोठा धक्का दिला.

66-2  : शाहरूख खारकडून पुन्हा निराशा

पंजाबचा आक्रमक फलंदाज शाहरूख खानने पुन्हा एकदा निराशा केली. त्याला 19 धावांवर उमरान मलिकने बाद केले.

28-1 : हैदराबादला पहिला धक्का

हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो 23 धावा करून बाद झाला. त्याला फझलहक फारूकीने बाद केले.

रोमारियो शेफर्ड - वॉशिंग्टन सुंदरची भागीदारी

हैदराबादचा निम्मा संघ शंभरच्या आत माघारी गेल्यानंतर रोमारियो शेफर्ड आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी भागीदारी रचत हैदराबादला दीडशतकी मजल मारून दिली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी 28 चेंडूत 58 धावांची भागीदारी रचली. यामुळे हैदराबादने 20 षटकात 7 बाद 156 धावांपर्यंत मजल मारली. रोमारियो शेफर्डने 15 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदरने 19 चेंडूत 25 धावा केल्या.

96-5 : हैदराबादचा निम्मा संघ माघारी

हरप्रीत ब्रारने आपली तिसरी शिकार करत अॅडिन माक्ररमला 21 धावांवर बाद केले. डावखुरा फिरकी गोलंदाज हरप्रीतने हैदराबादच्या पहिल्या पाच पैकी तीन फलंदाजांना बाद केले.

87-4 : एलिसने केली पूरनची शिकार

एलिसने धोकादायक फलंदाज निकोलस पूरनला 5 धावांवर बाद करत हैदराबादला चौथा धक्का दिला.

76-3 : अभिषेकचे अर्धशतक हुकले

हरप्रीत ब्रारने अभिषेक शर्माला 43 धावांवर बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. अभिषेकचे अर्धशतक 7 धावांनी हुकले.

61-2 : राहुल त्रिपाठी स्वस्तात माघारी

सनराईजर्स हैदराबादचा फॉर्ममध्ये असलेल्या राहुल त्रिपाठीला हरप्रीत ब्रारने 20 धावांवर बाद करत हैदराबादचा दुसरा फलंदाज माघारी धाडला.

14-1 : हैदराबादला पहिला धक्का 

पंजाबच्या कसिगो रबाडाने प्रियम गर्गला 4 धावांवर बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला.

हैदराबादचा फलंदाजीचा निर्णय 

सनराईजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Ipl 2022 Sunrisers Hyderabad Vs Punjab Kings 70th Match Live Cricket Score Highlights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top