छोड न यार, ये बुमराह-वुमराह क्या करेंगे? कोहलीचा किस्सा

jasprit bumrah
jasprit bumrahSakal

जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वात खतरनाक गोलंदाज आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र असलेलाया बुमराह आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना दिसते. 28 वर्षीय बुमराहला (Jasprit Bumrah) आता मुंबई इंडियन्सनं उप कर्णधाही केले आहे. आपली अजब गजब गौलंदाजी शैली आणि यॉर्करचा भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धी संघातील फंलदाजाला गारद करणाऱ्या या गोलंदाजाने अल्पावधीत मोठ यश मिळवलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रमही त्याच्या नावे आहेत. बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा त्यावेळीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला बाद केले होते. आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात बुमराहनं तीन विकेट घेतल्या होत्या. याच सामन्यात बुमराह प्रकाश झोतात आला. पण कोहलीला त्याच्याबद्दल फार काही ग्रेट वाटले नाही. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर पार्थिव पटेल याने यासंदर्भातील एक खास किस्सा शेअर केलाय.

jasprit bumrah
IPL 2022 : फाफ-विराट जोडी बघून RCB चाहत्यांना आठवला एबी

पूर्व भारतीय क्रिकेटर पार्थिव पटेलने बुमराहसाठी आरसीबीमध्ये सेटिंग लावण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत तो थेट कोहलीला बोलला होता. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीमध्ये पार्थिव पटेलनं यासंदर्भातील किस्सा शेअर केलाय. पार्थिव पटेल म्हणाला की, बुमराहला बंगळुरुच्या ताफ्यात सामील करुन घ्यावे, असा सल्ला मी विराट कोहलीला दिला होता. पण त्याने याला साफ नकार दिला. 2014 मध्ये मी ज्यावेळी आरसीबीत होतो. त्यावेळी कोहलीला म्हणालो की, बुमराह नावाचा एक चांगला गोलंदाज आहे. आपण त्याला आपल्या ताफ्यात घेऊ शकतो. यावर विराट म्हणाला की, "छोड़ न यार, ये बुमराह-वुमराह क्या करेंगे?"

jasprit bumrah
IPL 2022 : पंजाबच्या विजयानंतर प्रितीची 'क्युट' पोस्ट व्हायरल

पार्थिव पटेल त्यावेळी रणजी स्पर्धेत गुजरातचे नेतृत्व करत होता. बुमराह त्याच्या नेतृत्वाखालीच खेळ होता. 2013 मध्ये बुमराहने रणजीच्या मैदानात उतरला. 2014 च्या हंगामात तो संघर्ष करत होता. पुढच्या हंगामात तो खूपच खराब कामगिरी करत होता. हंगामाच्या मध्यावरच त्याला घरी पाठवण्याच्या हालचाली सुरु होत्या. मुंबई इंडियन्सच्या सपोर्टमुळे त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा केली. मुंबई इंडियन्सने त्याची क्षमता ओळखली आणि तो स्टार झाला, असेही पार्थिव पटेल यावेळी म्हणाला.

बुमराहने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 156 सामन्यात 303 विकेट घेतल्या आहेत. त्याने 9 वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करुन दाखवलाय. कसोटीत 123, वनडेत 113 आणि टी-20 मध्ये त्याच्या खात्यात 67 विकेट जमा आहेत. बुमराहने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि भारतात एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रमही करुन दाखवलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com