VIDEO : कुलदीपनं टाकला 'ड्रीम बॉल'; काही कळायच्या आत फलंदाज बोल्ड

IPL 2022 DC vs GT Kuldeep Yadav Dream Delivery
IPL 2022 DC vs GT Kuldeep Yadav Dream DeliverySakal

IPL 2022 DC vs GT: आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीत कुलदीप यादवच्या फिरकीतील जादू दिसली. गुजरात टायन्सच्या विजय शंकरची त्याने घेतलेली विकेट सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. कुलदीपनं या सामन्यात एकमेव विकेट घेतली. त्याने टाकलेला ड्रीम बॉल (Dream Ball) सर्वांना आश्चर्यचकित करणारा होता. करियमध्ये टाकलेल्या सर्वोत्तम चेंडूला 'ड्रीम बॉलट असे संबोधले जाते. क्रिकेटच्या मैदानात दिवंगत फिरकीपटू शेन वार्न (Shane Warne) याने 1993 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात माइक गॅटिंगला टाकलेला चेंडू 'बॉल ऑफ द सेंच्युरी' (Ball of the Century) म्हणून ओळखला जातो. ज्या चेंडूवर गॅटिंग बोल्ड झाला तो चेंडू जवळपास 90 अंशात टर्न झाला होता. वॉर्नच्या निधनानंतर या चेंडूची पुन्हा चर्चा रंगली होती.

आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) अप्रतिम चेंडू टाकून सर्वांच लक्ष वेधलं आहे. विजय शंकर ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू कुलदीपच्या करियरमधील ड्रीम बॉल ठरेल, असे बोलले जात आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हा कुलदीपनं घेतलेल्या विकेटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याला ड्रीम बॉल असं कॅप्शन देण्यात आलय.

IPL 2022 DC vs GT Kuldeep Yadav Dream Delivery
IPL Poinsts Table: इशान टॉपर; MI तळागाळात तर CSK समोर भोपळा

कुलदीप यादवचा 'ड्रीम बॉल'

गुजरात टायटन्स (Guajarat Titans) विरुद्धच्या सामन्यात कुलदीपने क्रिकेट चाहत्यांना हैराण करुन सोडणारा चेंडू टाकल्याचे पाहायला मिळाले. गुजरातच्या डावातील सातव्या चेंडूतील पहिल्या चेंडूवर कुलदीपने विजय शंकरला बोल्ड केल. हा चेंडू कमालीचा स्पिन झाल्याचे दिसले. कुलदीपन फ्लायटेड चेंडू टाकून फलंदाजाला आमीश दाखवलं. चेंडू टप्पा पडल्यावर झपकन आता आला आणि विजय शंकर बोल्ड झाला. चेंडूचा टप्पा हा ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला होता. फलंदाजाने स्विप मारण्याचा प्रयत्न केला. पण कमालीच्या टर्नमुळे त्याला विकेट कशी पडली तेच कळलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com