ipl-2023 cameraman injured
ipl-2023 cameraman injured

IPL 2023 : गुजरात-राजस्थान सामन्यात मोठा अपघात! थोडक्यात वाचला जीव, Video

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

IPL 2023 Video : आयपीएलचा 48 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यादरम्यान मैदानावर मोठा अपघातही पाहायला मिळाला. या अपघातात एकाचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 
ipl-2023 cameraman injured
ICC Ranking ODI : IPL सुरू असतानाच पाकने साधला डाव! भारत, ऑस्ट्रेलियाला मागे टाकत पोहचला पहिल्या स्थानी

आयपीएलच्या या मोठ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण राजस्थान रॉयल्सची फलंदाजी खराब राहिली, संपूर्ण संघ 118 धावांत गारद झाला. राजस्थान रॉयल्सच्या खेळीदरम्यान ट्रेंट बोल्टच्या बॅटमधून असा शॉट दिसला, ज्यामुळे कॅमेरामनला गंभीर दुखापत झाली. हा शॉट थेट कॅमेरामनला लागला.

 
ipl-2023 cameraman injured
ब्रिजभूषण यांनी श्वास तपासण्याच्या बहाण्याने स्तन, पोटाला केला स्पर्श; महिला पैलवानांचा धक्कादायक जबाब!

या सामन्यात ट्रेंट बोल्टने 15 धावांचे योगदान दिले. या खेळीदरम्यान ट्रेंट बोल्टने मिडविकेटच्या दिशेने षटकार ठोकला. हा षटकार थेट सीमारेषेबाहेर उभा असलेल्या कॅमेरामनकडे गेला. या घटनेनंतर गुजरातच्या टीम फिजिओने कॅमेरामनला मदत केली, दिलासादायक बातमी म्हणजे दुखापत गंभीर नव्हती. या घटनेनंतर सामना काही काळ थांबवावा लागला.

 
ipl-2023 cameraman injured
Cheteshwar Pujara : स्टीव्ह स्मिथही हैराण! WTC फायनलपूर्वी पुजाराने ठोकले सलग तिसरे शतक

गतविजेत्या गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 16व्या हंगामात 7 वा विजय नोंदवला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाने जयपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 9 विकेट राखून पराभव केला. या सामन्यात गुजरात संघाने राजस्थानचा डाव 17.5 षटकांत अवघ्या 118 धावांत गुंडाळला. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि सलामीवीर साहा यांनी हे सोपे लक्ष्य केवळ 13.5 षटकांतच गाठले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com