MI vs GT : 'आमच्या संघातून फक्त रशीदच...' गुजरातच्या पराभवानंतर कर्णधार पंड्या संतापला

पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने आपल्या संघाच्या खराब खेळावर केले मोठे वक्तव्य
Hardik Pandya
Hardik Pandya

MI vs GT Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीगचा 57 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी करत गुजरातवर 27 धावांनी विजय मिळवला. या मोठ्या विजयाचा हिरो ठरला सूर्यकुमार यादव. त्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावा करत झंझावाती शतक झळकावले.

प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्सवर 218 धावा केल्यानंतर मुंबईने गुजरातचा डाव आठ गड्यांच्या मोबदल्यात 191 धावांवर रोखला. गुजरात टायटन्सच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने आपल्या संघाच्या खराब खेळावर मोठे वक्तव्य केले आहे.

Hardik Pandya
IND vs PAK: वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध पाक सामना होणार नाही! PCB अध्यक्षांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, आम्ही खेळाच्या कोणत्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकलो नाही. आमच्याकडे स्पष्ट योजना होती पण गोलंदाजांनी योजना पूर्ण केल्या नाहीत. आमच्या संघातून फक्त रशीदच खेळत असल्याचे दिसत होता. तो फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगला खेळला. रशीदमुळे आमच्या नेट रनरेटचे मोठे नुकसान झाले नाही.

Hardik Pandya
IPL 2023 SRH vs LSG : प्ले-ऑफची शर्यत रंजक! लखनौ-हैदराबादची विजयासाठी झुंज

या विजयानंतर मुंबई संघ 12 सामन्यांत सात विजयांसह 14 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. गुजरात संघ तितक्याच सामन्यांमध्ये 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्सचा 27 धावांनी पराभव केल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, 'हा सामना खूप रोमांचक ठरला. आम्हाला या दोन अंकांची खूप गरज होती. या मैदानावर लक्ष्याचा बचाव करणे उत्कृष्ट होते.

मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. तो सामनावीर ठरला. त्याने आपली खेळी टी-20 मधील सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचे म्हटले आहे. सूर्यकुमार म्हणाला, 'टी-20 मधील ही माझी सर्वोत्तम खेळी होती. त्याचवेळी रशीद खानने 32 चेंडूत 79 धावांची नाबाद खेळी करत गुजरातच्या चार विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या डावात 10 षटकार मारले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com