IPL 2023 : लखनौला धक्का! पंजाबचा बँड वाजवणारा मॅच विनर दिग्गज खेळाडू जखमी, पुढील सामन्यातून बाहेर?

केएल राहुल आणि संघाचे टेन्शन वाढले...
IPL 2023 Injury Scare for Marcus Stoinis in LSG's Crushing Win Over Punjab Kings
IPL 2023 Injury Scare for Marcus Stoinis in LSG's Crushing Win Over Punjab Kings

IPL 2023 Marcus Stoinis Injury : आयपीएल 2023 चा 38 वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. सामना पाहुण्या संघ लखनौ सुपर जायंट्सने हा सामना 56 धावांनी जिंकला. या सामन्यात लखनौचा स्टार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस होता, ज्याने प्रथम फलंदाजी करून कहर केला. त्यानंतर त्याने गोलंदाजीतही आपले कौशल्य दाखवले. मात्र, या धडाकेबाज खेळाडूला सामन्याच्या मध्यभागी दुखापत झाली, त्यामुळे आता केएल राहुल आणि त्याच्या संघाचे टेन्शन वाढले आहे.

IPL 2023 Injury Scare for Marcus Stoinis in LSG's Crushing Win Over Punjab Kings
WTC फायनलपूर्वी टीम इंडिया टेन्शनमध्ये! हा दिग्गज खेळाडू IPL मध्ये सतत होतोय फ्लॉप अन्...

पंजाब किंग्जविरुद्ध सामनावीर ठरलेला मार्कस स्टॉइनिस सध्या बोटाच्या दुखापतीशी झुंज देत आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्टॉइनिसला दुखापत झाली होती. खरं तर, मार्कस पीबीकेएस विरुद्ध त्याचे दुसरे षटक टाकत होता.

या षटकात पंजाबचा फलंदाज अथर्व तायडेने वेगवान स्ट्रेट ड्राइव्हला मारला, स्टॉइनिसने थांबवण्याच्या प्रयत्नात स्वत:ला दुखापत केली. त्यानंतर वैद्यकीय कर्मचारी मैदानावर आले आणि त्यांनी स्टॉइनिसच्या दुखापतीची तपासणी केली. दुखापतीचे गांभीर्य पाहून त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूला मैदानाबाहेर जाण्याचा सल्ला दिला. शेवटी असेच झाले, स्टोइनिस त्याच्या दुसऱ्या षटकातील पाच चेंडू टाकून मैदानाबाहेर गेला.

IPL 2023 Injury Scare for Marcus Stoinis in LSG's Crushing Win Over Punjab Kings
IPL 2023: 'रणनीती ठरली चुकीची...' संघाच्या पराभवानंतर कर्णधार धवन संतापला! कोणावर फोडले पराभवाचे खापर

ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्कस स्टॉइनिसच्या बोटाला आता स्कॅन करण्यात येणार असून त्यानंतरच दुखापत किती गंभीर आहे हे कळेल. या दुखापतीमुळे स्टॉइनिस लखनौचे काही सामने मुकणार यात शंका नाही. एवढेच नाही तर दुखापत आणखी खोलवर गेल्यास तो आयपीएल 2023 मधूनही बाहेर जाऊ शकतो.

मार्कससारख्या मॅचविनरला झालेली दुखापत हा एलएसजीसाठी मोठा धक्का आहे. स्टॉइनिसने पंजाबविरुद्ध अवघ्या 40 चेंडूत 72 धावा केल्या आणि गोलंदाजीत पीबीकेएसचा कर्णधार शिखर धवनची मोठी विकेटही घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com