IPL 2023 : मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची घंटा! कर्णधार रोहितचा प्लेऑफमध्ये लाजिरवाणा रेकॉर्ड

कर्णधार रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय काय आहे कारण?
Rohit-Sharma-Sad
Rohit-Sharma-Sad

Rohit Sharma Records Playoff : आयपीएल 2023 चा एलिमिनेटर सामना आज चेन्नईतील चेपॉक येथे खेळल्या जाणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना अपेक्षित आहे. दोन्ही संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार मेहनत घेतली आहे.

आजचा सामना जो संघ जिंकेल तो स्पर्धेत पुढे जाईल, तर पराभूत संघाचा प्रवास इथेच संपेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांच्या कर्णधारांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. मात्र याच दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा एक विक्रम समोर आला आहे, जो मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय आहे.

Rohit-Sharma-Sad
LSG vs MI IPL 2023 Eliminator: कोणता संघ आज होणार बाहेर? एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्स -लखनौ आमने-सामने

रोहित शर्मा 2008 पासून आयपीएलचा भाग आहे. तेव्हापासून रोहित अनेकदा आयपीएलच्या प्लेऑफचा भाग राहिला आहे. रोहितने प्लेऑफमध्ये एकूण 19 सामने खेळले आहेत ज्यात त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने भलेही पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली असेल, पण प्लेऑफमधील रोहितच्या कामगिरीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

रोहितने या 19 सामन्यांमध्ये फक्त 16.50 च्या सरासरीने आणि 108.79 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत केवळ 297 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत रोहितला आजच्या सामन्यात चालणे फार कठीण वाटते, कारण या वर्षी तो आधीच लय मध्ये नाही.

Rohit-Sharma-Sad
LSG vs MI IPL 2023 Eliminator: कोणता संघ आज होणार बाहेर? एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्स -लखनौ आमने-सामने

या मोसमात खराब सुरुवात करूनही मुंबई इंडियन्सने आयपीएल प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे, परंतु अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी सोपा असणार नाही. मुंबईचा संघ आज लखनौविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळणार आहे.

दोन्ही संघांमधील हेड-टू-हेडच्या आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईने लखनौविरुद्ध आजपर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. समजा आजचा सामना मुंबईने जिंकला तर त्यांचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. जो अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे एकूणच मुंबईसाठी प्ले ऑफचा रस्ता सोपा नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com