IPL 2023 : फायनलच्या तिकिटांसाठी क्रिकेटप्रेमीमध्ये हाणामारी! चेंगराचेंगरीचा Video पाहून उडेल थरकाप

ipl 2023 mi vs gt qualifier 2 final tickets stampede video mismanagement at ahmedabad narendra modi cricket stadium
ipl 2023 mi vs gt qualifier 2 final tickets stampede video mismanagement at ahmedabad narendra modi cricket stadium

आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये फक्त २ सामने बाकी आहेत आणि दोन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यातील दुसरा क्वालिफायर आज (२६ मे) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार असून, २८ मे रोजी याच मैदानावर आयपीएलचा अंतिम सामनाही होणार आहे.

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आधीच अंतिम फेरी गाठली असून मुंबई आणि गुजरात यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरच्या निकालावर दुसरा संघ निश्चित होणार आहे.

सर्वांच्या नजरा गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायरकडे लागल्या आहेत. मात्र या सामन्याआधी एक व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून आयपीएल 2023 च्या उर्वरित दोन सामन्यांसाठी चाहते किती वेडे आहेत याचा अंदाज येईल.

या सामन्याचे तिकीट घेण्यासाठी चाहत्यांनी लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. या गर्दीचे असेही काही व्हिडीओ समोर आले आहेत, जे पाहून कोणीही घाबरून जाईल. कारण या सामन्याच्या तिकीटासाठी रांगेत चक्क मारामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

ipl 2023 mi vs gt qualifier 2 final tickets stampede video mismanagement at ahmedabad narendra modi cricket stadium
किती ही मस्ती! आधिकाऱ्याचा फोन पडला बंधाऱ्यात; ३ दिवस ३० एचपी पंपाने नासवलं पाणी

या चेंगराचेंगरीच्या स्थीतीमुळे स्टेडियम व्यवस्थापकांकडून यासाठी योग्य व्यवस्था न केल्याचा आरोप चाहत्यांकडून केला जात आहे. यावेळी परिस्थिती एवढी अनियंत्रित झाली की, पोलिसांना बोलवावे लागले. यादरम्यान धक्काबुक्कीमुळे अनेक जण खालीही पडल्याचे दिसून आले.

या घटनेवेळी ज्यांनी क्वालिफायर-२ आणि फायनलसाठी ऑनलाइन तिकीट काढले होते असे लोकही तिकीट घेण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते. त्यामुळे काही वेळातच गर्दी इतकी वाढली की चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली.

ipl 2023 mi vs gt qualifier 2 final tickets stampede video mismanagement at ahmedabad narendra modi cricket stadium
9 Years Of Modi Government : नऊ वर्षात घेतलेल्या 'या' निर्णयांमुळे आजही मोदींना हरवणं जवळपास अशक्य; वाचा सविस्तर

चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. एलिमिनेटरमध्ये, मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना गुजरातशी होईल. सीएसकेने आयपीएलच्या इतिहासात १०व्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. दुसरा क्वालिफायर जिंकणारा संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com