IPL 2023 Playoffs Scenario: 10 पैकी फक्त 1 संघाची एंट्री! 3 शर्यतीबाहेर; प्ले-ऑफसाठी 6 संघांचे बिघडले समीकरण

आयपीएल 2023 च्या प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस रोमांचक होत आहे कारण...
IPL 2023 Playoffs Scenario
IPL 2023 Playoffs Scenariosakal

IPL 2023 Playoffs Scenario : आयपीएल 2023 च्या प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस रोमांचक होत आहे. 10 संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या मेगा इव्हेंटला दीड महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी आतापर्यंत केवळ एकच संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. त्याचबरोबर तीन संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 6 संघांमध्ये अजूनही लढत सुरू आहे. आता आयपीएल लीग टप्प्यात फक्त पाच सामने बाकी आहेत. आता शेवटच्या सामन्यानंतरच स्पष्ट होईल की कोणते चार संघ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करतील.

IPL 2023 Playoffs Scenario
Suryakumar Yadav Virat Kohli : विराटच्या शतकानंतर सूर्याने केली परतफेड; म्हणाला...

10 संघांपैकी तीन संघ या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या सामन्यानंतर तिसरा संघ प्ले ऑफमधून बाहेर पडला. आधी दिल्ली कॅपिटल्स नंतर सनरायझर्स हैदराबाद आणि आता पंजाब किंग्जचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादला इतर संघांचे समीकरण बिघडवण्याची चांगली संधी आहे.

या दोन्ही संघांना लीग टप्प्यात प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे. जिथे दिल्लीचा सामना CSK आणि सनरायझर्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. CSK आणि मुंबई इंडियन्स अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.

IPL 2023 Playoffs Scenario
Virat Kohli RCB : विराटपेक्षा क्लासेनचं शतक भारी! इंग्लंडच्या माजी कर्णधारानं नाक खुपसलं

प्लेऑफच्या शर्यतीत 6 संघ अजूनही कायम आहेत, त्या संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सची नावे आहेत. या संघांपैकी चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांना प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची उत्तम संधी आहे. आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात निकराची लढत आहे.

IPL 2023 Playoffs Scenario
Gambhir Vs Rajat Sharma : विराटचे शतक अन् रजत शर्मांचा गंभीरला चिमटा! ट्वीट करत म्हणाले...

गुजरात टायटन्स संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांनी गेल्या वर्षीचा फॉर्म कायम ठेवल्याचे दिसते. त्यांचा संघ प्रथम प्लेऑफसाठी पात्र ठरला. गेल्या मोसमातही त्यांच्या संघाने प्लेऑफमध्ये पहिले स्थान पटकावले होते. गुजरात टायटन्सचा संघ 13 सामन्यांतून 18 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे आणि उर्वरित संघांपैकी कोणताही संघ 18 गुणांपर्यंत पोहोचू शकणार नसल्याने त्यांचा संघ पहिल्या स्थानावर राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com