IPL 2023 Playoff Scenarios : DC अन् SRH प्रवास संपला! पण या 4 संघांचे तोडू शकतात प्ले-ऑफचे स्वप्न… जाणून घ्या समीकरण

प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर असलेल्या SRH आणि DC कडून चार संघांना धोका
 
IPL 2023 playoffs scenarios points table
IPL 2023 playoffs scenarios points table

IPL 2023 Playoffs Scenarios Points Table : आयपीएल 2023 मध्ये खरा खेळ आता कुठे सुरू झाला आहे. कारण दोन संघ आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, तर एक संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आता जो संघ पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे स्थान प्लेऑफसाठी सुरक्षित झाले आहे, पण जे संघ आता या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, ते इतर संघांचा खेळ खराब करू शकतात.

आतापर्यंत संघ स्वतःसाठी खेळत होते, परंतु आता जे संघ बाहेर आहेत ते इतर संघांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. जे अद्याप प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे हे खेळ बिघडवणारे सामने एक-दोन नसून चार आहेत.

 
IPL 2023 playoffs scenarios points table
IPL 2023 Playoff Scenario : शर्यतीतून 2 संघ बाहेर! आता 7 संघांमध्ये अडकला पेच; संघांचे प्लेऑफ समीकरण पुन्हा बिघडले

सीएसके आणि पंजाब किंग्जविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचे उर्वरित दोन सामने

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स आयपीएल 2023 मधुन बाहेर पडणारा पहिला संघ होता. पण संघाचे अजून दोन सामने बाकी आहेत. संघ आपला पुढचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध 17 मे रोजी धर्मशाला येथे खेळणार आहे. पंजाब किंग्जला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. जरी संघ सध्या 12 सामन्यांतून 12 गुणांसह आठव्या क्रमांकावर असला तरी पंजाबने आपले दोन्ही सामने जिंकले तर त्याला अव्वल 4 मध्ये जाण्याची संधी असेल. पण सामना हरताच ही आशा मावळेल. म्हणजेच पुढील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला हरवले तर दिल्लीसोबतच पंजाबचाही खेळ संपुष्टात येऊ शकतो.

यानंतर दिल्लीचा पुढचा सामना 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जसोबत आहे. सीएसके प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता असली तरी, आपले स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना दिल्लीविरुद्धचा शेवटचा साखळी सामना जिंकावा लागेल. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर होणार आहे. दिल्लीचा संघ हा सामना जिंकला तर सीएसकेला दुसऱ्या संघांवर अवलंबून राहावे लागेल. म्हणजे पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्जला दिल्लीपासून धोका आहे.

 
IPL 2023 playoffs scenarios points table
IPL 2023: शुभमनचं शतक तरीही कोच नेहरा नाराज... कर्णधार हार्दिकशी केले भांडण

मुंबई इंडियन्स आणि आरसीबीविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचे उर्वरित दोन सामने

एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादची सोमवारी गुजरात टायटन्सकडून पराभूत झाल्यानंतर प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. संघाचा पुढील सामना 18 मे रोजी आरसीबीविरुद्ध हैदराबादमध्ये म्हणजेच त्यांच्या घरी मैदानावर खेळायचा आहे. आरसीबीही प्लेऑफचा दावेदार आहे, पण जर त्यांनी एक सामना गमावला तर त्यांचा खेळ जवळपास संपेल.

हैदराबादचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्स सोबत आहे, मुंबई इंडियन्स सध्या टॉप 4 मध्ये आहेत, पण जर SRHने त्यांना हरवले तर ते बाहेर पडणार नाहीत, पण त्यांची शक्यता खूपच कमी असेल. मुंबई संघाने हा सामना जिंकल्यास प्लेऑफमधील त्यांचे स्थान जवळपास निश्चित होईल, मात्र पराभवानंतर इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागेल.

म्हणजेच प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर असलेल्या SRH आणि DC कडून एकूण चार संघांना धोका आहे. हे संघ खेळ खराब करू शकतात का, की पुढील सामने गमावून गुणतालिकेत नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर राहतील हे पाहायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com