IPL 2023 Prize Money: चॅम्पियन चेन्नई झाली मालामाल! हरल्यानंतरही GTला मिळाले कोटी; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले अन्...
IPL 2023 Prize Money
IPL 2023 Prize Money

IPL 2023 Prize Money : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पावसाने व्यत्यय आणलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला.

या विजयासह चेन्नईने सर्वाधिक 5 विजेतेपद पटकावण्याच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली. आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला डकवर्थ-लुईस नियमानुसार 15 षटकांत विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य मिळाले जे त्यांनी शेवटच्या चेंडूवर पूर्ण केले.

IPL 2023 Prize Money
MS Dhoni CSK Victory : विजयाचं समाधान! शेवटच्या चेंडूवरील धोनीची ऐतिहासिक रिॲक्शन व्हायरल

चेन्नई सुपर किंग्सला केवळ चमकदार ट्रॉफीच मिळाली नाही, तर संघाला विजेते म्हणून 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. तर उपविजेत्या गुजराज टायटन्सला 12.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या मुंबई इंडियन्सला बक्षीस म्हणून 7 कोटी रुपये मिळाले. दुसरीकडे चौथ्या स्थानावर असलेल्या लखनौ सुपर जायंट्सला बक्षीस म्हणून 6.5 कोटी रुपये मिळाले आहेत.

IPL 2023 Prize Money
MS Dhoni CSK Won IPL : निवृत्तीची ही योग्य वेळ... धोनीने पुन्हा हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर मारला षटकार

आयपीएलच्या पहिल्या सत्रात विजेत्याला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. त्याच वेळी उपविजेत्याच्या बॅगमध्ये 2.4 कोटी रुपये आले. तेव्हापासून बक्षिसाची रक्कम अनेक पटींनी वाढली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बक्षिसाच्या रकमेत वाढ झालेली नाही. मात्र पुढील वर्षी त्यात वाढ होऊ शकते.

आयपीएल 2023चे विजेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स आणि उपविजेत्या गुजरात टायटन्सवरच पैशांचा पाऊस पडला. पर्पल, ऑरेंज कॅप जिंकणाऱ्यांव्यतिरिक्त, हंगामातील सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या इमर्जिंग प्लेयरवरही पैशांचा वर्षाव करण्यात आला.

IPL 2023 Prize Money
MS Dhoni CSK Victory : विजयाचं समाधान! शेवटच्या चेंडूवरील धोनीची ऐतिहासिक रिॲक्शन व्हायरल

1. इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर - यशस्वी जैस्वाल - 10 लाख रु

2. पर्पल कॅप - मोहम्मद शमी - 28 विकेट्स (10 लाख रुपये)

3. ऑरेंज कॅप - शुभमन गिल - 890 धावा (10 लाख)

4. हंगामातील सर्वाधिक षटकार - फाफ डुप्लेसी - 36 षटकार - 10 लाख रु.

5. गेम चेंजर ऑफ द सीझन - शुभमन गिल - 10 लाख रु

6. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर - शुभमन गिल - 10 लाख रु

7. मोसमातील सर्वात लांब षटकार : फाफ डू प्लेसिस - 10 लाख रुपये

8. कॅच ऑफ द सीझन - राशिद खान - 10 लाख रु

9. पेटीएम फेअरप्ले पुरस्कार - दिल्ली कॅपिटल्स

10. हंगामातील सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान - वानखेडे स्टेडियम आणि ईडन गार्डन्स - 50 लाख रुपये

11. सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन - ग्लेन मॅक्सवेल - 10 लाख रु

12. मोसमात सर्वाधिक चौकार - शुभमन गिल (85) - 10 लाख रु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com