Rinku Singh: रिंकू सिंहनं एकाच षटकात केले खंडीभर विक्रम; इतिहास रचत साकारला शेवटच्या षटकातील सर्वात मोठा विजय

अखेरच्या पाच चेंडूंत पाच षटकारांची बरसात करत रिंकू सिंग हा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला
IPL 2023 Rinku Singh
IPL 2023 Rinku Singh

गुजरात टायटन्सने विजयासाठी ठेवलेल्या 205 धावांचा पाठलाग करताना केकेआरने झुंजार खेळ करत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. केकेआरचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंहने शेवटच्या षटकात विजयासाठी 29 धावांची गरज होती त्यावेळी सलग पाच षटकार मारत सामना जिंकून दिला. रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा चोपल्या. तर इतकेच नव्हे तर रिंकू सिंहनं एकाच षटकात खंडीभर विक्रम केले आहेत. (IPL 2023 Rinku Singh Batters hitting five sixes in an over in the IPL )

अखेरच्या पाच चेंडूंत पाच षटकारांची बरसात करत रिंकू सिंग हा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला. अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने पाच षटकार लगावले आणि संघाला विजय मिळवून दिला. गुजरातने केकेआरपुढे २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान केकेआरने तीन विकेट्स राखत पूर्ण केले.

आयपीएलमध्ये एका षटकात पाच षटकार मारण्याच्या विक्रमासह रिंकू सिंगने 20 व्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे.

आयपीएलमध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक धावा

३० - रिंकू सिंग विरुद्ध गुजरात (२०२३)

२२ - रोहित शर्मा विरुद्ध केकेआर (२००९)

22 - एमएस धोनी विरुद्ध पीबीकेएस (2016)

आयपीएलमध्ये एका षटकात पाच षटकार मारणारे फलंदाज

ख्रिस गेल (RCB) विरुद्ध राहुल शर्मा (PWI), बंगलोर, 2012

राहुल तेवतिया (RR) वि शेल्डन कॉट्रेल (PBKS), शारजाह, 2020

रवींद्र जडेजा (CSK) विरुद्ध हर्षल पटेल (RCB), मुंबई WS, 2021

मार्कस स्टॉइनिस आणि जेसन होल्डर (LSG) विरुद्ध शिवम मावी (KKR), पुणे, 2022

रिंकू सिंग (KKR) विरुद्ध यश दयाल (GT), अहमदाबाद 2023

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com