Akash Madhwal: पाच विकेट घेणाऱ्या आकाशची होणार टीम इंडियात एन्ट्री? कर्णधार रोहितने दिले संकेत

कर्णधार रोहित शर्माने आकाश मधवालच्या गोलंदाजीवर केले मोठे वक्तव्य...
ipl 2023 will akash madhwal-who-took-five-wickets-have-an-entry-in-team india-captain-rohit sharma
ipl 2023 will akash madhwal-who-took-five-wickets-have-an-entry-in-team india-captain-rohit sharma

Rohit Sharma on Akash Madhwal IPL 2023 : आयपीएलच्या एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 81 धावांनी पराभव केला. यासह लखनौचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. गेल्या मोसमातही लखनौला प्ले-ऑफ फेरीतच हार पत्करावी लागली होती. मुंबई इंडियन्सच्या या विजयात उत्तराखंडचा 29 वर्षीय गोलंदाज आकाश मधवालचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने अवघ्या 3.3 षटकांत पाच धावांत पाच गडी बाद करत मुंबई इंडियन्सचा विजय निश्चित केला.

आकाश मधवालच्या या उत्कृष्ट गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले आणि अनेक दिग्गजांचेही लक्ष वेधून घेतले. त्याची गोलंदाजी पाहून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या टीम इंडियातील एन्ट्रीचे मोठे संकेत दिले आहेत.

ipl 2023 will akash madhwal-who-took-five-wickets-have-an-entry-in-team india-captain-rohit sharma
Akash Madhwal : 'मी इंजिनियर असल्याने...' आकाश माधवालने हर्षा भोगलेंना दिले जबरदस्त उत्तर

सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आकाश मधवालच्या गोलंदाजीवर मोठे वक्तव्य केले. आकाशच्या गोलंदाजीचे कौतुक करताना रोहित म्हणाला, तो गेल्या वर्षी मुंबई इंडियन्ससोबत सहाय्यक गोलंदाज म्हणून संघात सामील झाला होता. जोफ्रा गेल्यानंतर मला खात्री होती की आमच्या संघाला आवश्यक असलेली कौशल्ये त्याच्याकडे आहेत.

पुढे रोहित म्हणाला, अनेक वर्षे, मी मुंबई इंडियन्समधून टीम इंडियामध्ये आलेले अनेक खेळाडू पाहिले आहेत. तरुण खेळाडूंना संघातील सदस्यांसारखे वाटणे खूप महत्त्वाचे आहे. ते संघातील त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्ट आहेत. त्याला काय करावे लागेल? संघ आणि तुम्हाला काय हवे आहे?"

ipl 2023 will akash madhwal-who-took-five-wickets-have-an-entry-in-team india-captain-rohit sharma
Naveen Ul Haq On Virat Kohli : 'कोहली, कोहली' घोषणेवर नवीनने मौन तोडले, गौतम गंभीरला म्हटले लिजेंड अन्...

एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने लखनौ सुपरजायंट्ससमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईसाठी कॅमेरून ग्रीनने 23 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 41 धावा केल्या. गोलंदाजी करताना लखनौच्या नवीन-उल-हकने चार बळी घेतले.

मुंबई इंडियन्सच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचा संघ 101 धावांवर गारद झाला. मार्कस स्टॉइनिसशिवाय एकाही फलंदाजाला 20 चा आकडाही स्पर्श करता आला नाही. मुंबईसाठी आकाश मधवालशिवाय ख्रिस जॉर्डन आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com