IPL 2024 GT vs SRH : हैदराबाद संघाचे पारडे जड ; गत उपविजेत्या गुजरात संघाच्या गोलंदाजांचा कस

मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचे धक्के देणारे गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद उद्या आमने-सामने येत आहेत.
IPL 2024 GT vs SRH
IPL 2024 GT vs SRHsakal

अहमदाबाद : मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचे धक्के देणारे गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद उद्या आमने-सामने येत आहेत. मुंबई संघाच्या फसलेल्या रणनीतीचा या दोघांनीही फायदा घेतला, पण आता एकमेकांसमोर कशी व्यूहरचना करतात यावर सामन्याचे भवितव्य अवलंबून असेल.

गुजरात संघाने आपल्या सलामीच्या सामन्यात पूर्वाश्रमीचा कर्णधार हार्दिक पंड्या याची पुरती फसगत केली. चक्रव्यूहात त्याला आणि त्याच्या मुंबई संघाला अडकवून विजयाची मुहूर्तमेढ रोवली. हैदराबादचा संघ तर गत आयपीएलमध्ये तळाच्या स्थानावर होता, परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात त्यांनी याच मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक २७७ ही धावसंख्या उभारली, त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला त्यांचा संघ गुजरातसाठी धोकादायक ठरू शकेल.

गुजरात आणि हैदराबाद यांचा एक विजय एक पराभव झाला आहे. त्यामुळे दोघांच्याही नावावर प्रत्येकी दोन गुण आहेत. त्यामुळे उद्या एकमेकांविरुद्ध आघाडी कोण घेतो याची उत्सुकता असेल, पण गुजरातच्या संघासमोर सरासरीत सुधारणा करण्याचेही लक्ष्य असेल. मुंबई इंडियन्सविरुद्ध भले त्यांनी शानदार विजय मिळवला, परंतु चेन्नईविरुद्ध त्यांना ६३ धावांच्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांची निव्वळ सरासरी -१.४२५ अशी आहे.

IPL 2024 GT vs SRH
IPL 2024 Cameron Green : रोहित-विराटसह खेळायला मिळणे हे भाग्यच ; ग्रीन

मोहम्मद शमीच्या जागी संधी मिळालेल्या उमेश यादवने मुंबईविरुद्ध अखेरच्या षटकात निर्णायक कामगिरी केली, परंतु चेन्नईविरुद्ध तो दोन षटकांच्या पुढे गोलंदाजी करू शकला नाही, एवढी त्याची धुलाई झाली होती.

उद्या तर मुंबईविरुद्ध चौकार-षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, एडेन मार्करम आणि अभिषेक शर्मा यांचा सामना करायचा आहे. या सर्व धडाकेबाज शैलीच्या फलंदाजांना रोखण्यासाठी गुजरातकडे रशीद खान हे हुकमी अस्त्र आहे.

हैदराबाद डार्क हॉर्स

यंदा हैदराबादकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिले जात आहे. त्यांची फलंदाजी तर फॉर्मात येत आहेच, पण नेतृत्व करत असलेला विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजीत कमाल करू शकतो. त्याला भुवनेश्वर कुमार कशी साथ देतो हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com