IPL 2024, LSG vs MI: मुंबई इंडियन्स वाढदिवशी रोहितला विजयाची भेट देणार? लखनौविरुद्ध रंगणार महत्त्वाचा सामना

IPL 2024, LSG vs MI: आयपीएलमध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळवला जाणार आहे.
Rohit Sharma - Suryakumar Yadav
Rohit Sharma - Suryakumar YadavSakal

IPL 2024, LSG vs MI: रोहित शर्माचा ३० एप्रिल हा वाढदिवस. या दिवशी तरी आपल्या संघातील या महान खेळाडूला विजयाची भेट त्याचे मुंबई इंडियन्समधील सहकारी देणार का, याची उत्सुकता आहे.

पराभवाच्या खाईत हेलकावे खाणाऱ्या मुंबईला यंदाच्या आयपीएलमध्ये आव्हान कायम ठेवायचे असेल तर आज(३० एप्रिल) के.एल. राहुलच्या लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभूत करावेच लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावर खेळणाऱ्या लखनौला सहाव्या विजयाची आस लागली असून त्यांनाही प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी विजय आवश्‍यक आहे. लखनौचा कर्णधार के.एल. राहुलच्या फलंदाजी स्ट्राईकरेटवर चोहोबाजूंनी टीका होत असल्यामुळे त्याच्या फलंदाजीवरही लक्ष असणार आहे.

Rohit Sharma - Suryakumar Yadav
LSG vs MI: लखनौविरुद्ध सामन्याआधी मुंबईचं टेंशन वाढलं! IPL 2024 मधील सर्वात वेगवान गोलंदाज पुनरागमनासाठी सज्ज

के.एल. राहुल लखनौसाठी सलामीला फलंदाजीला येतो. मात्र, पॉवरप्लेमध्येही त्याच्याकडून आक्रमक फटकेबाजी केली जात नाही. अर्थात त्याने १४४.२७च्या स्ट्राईकरेटने ३७८ धावा फटकावल्या आहेत; पण त्यांचा फलंदाजी स्ट्राईकरेट रिषभ पंत (१६०.६०) व संजू सॅमसन (१६१.०८) यांच्यापेक्षा कमी आहे.

त्यामुळे भविष्यात त्याला यष्टिरक्षक व फलंदाज म्हणून भारतीय संघात प्रवेश करावयाचा असल्यास फलंदाजी स्ट्राईकरेट सुधारावा लागणार आहे.

गोलंदाजी विभाग कमकुवत

मुंबईच्या संघाला यंदाच्या मोसमात सपाटून मार खावा लागला आहे. जसप्रीत बुमरावगळता मुंबईच्या गोलंदाजांना ठसा उमटवता आलेला नाही. दिल्लीच्या जेक फ्रेसर मॅकगर्क याने बुमराच्या गोलंदाजीवरही आक्रमण केले होते.

मुंबईच्या संघाला यामधून बाहेर यावे लागणार आहे. जेराल्ड कोएत्झी, हार्दिक पंड्या, आकाश मधवाल, पियूष चावला, मोहम्मद नबी, रोमारिओ शेफर्ड यांना गोलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे.

Rohit Sharma - Suryakumar Yadav
LSG vs MI: लखनौविरुद्ध सामन्याआधी मुंबईचं टेंशन वाढलं! IPL 2024 मधील सर्वात वेगवान गोलंदाज पुनरागमनासाठी सज्ज

विश्‍वकरंडकाआधी फॉर्मची गरज

रोहित शर्मा (३११ धावा) व सूर्यकुमार यादव (१६६ धावा) यांनी मुंबईसाठी समाधानकारक फलंदाजी केली आहे; पण आयपीएलमधील उर्वरित लढतींमध्ये त्यांच्याकडून आणखी चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

जून महिन्यात वेस्ट इंडीज व अमेरिका येथे होत असलेल्या टी-२० विश्‍वकरंडकाआधी दोघांनी फॉर्ममध्ये येण्याची नितांत गरज आहे. असे झाल्यास भारतीय संघासाठी ही आनंदाची बाब असणार आहे.

ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड व हार्दिक पंड्या यांनीही कात टाकायला हवी. अर्थात आतापर्यंत तिलक वगळता इतरांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.

Rohit Sharma - Suryakumar Yadav
T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

पराभवानंतर पुनरागमनाची आशा

मागील लढतीत राजस्थानकडून लखनौचा पराभव झाल्यानंतर आता के.एल. राहुलच्या नेतृत्वात लखनौला विजयी पुनरागमनाची आशा असेल. निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, क्विंटॉन डी कॉक, कृणाल पंड्या यांच्या खांद्यावर फलंदाजीची, तर यश ठाकूर, मोहसिन खान, रवी बिश्‍नोई यांच्यावर गोलंदाजीची मदार असणार आहे.

अर्थात काही खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याचा अभाव प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे अशा क्रिकेटपटूंनी खेळ उंचावण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com