IPL 2024 : रहमानुल्लाह गुरबाजला एमएस धोनीने दिला ऑटोग्राफ अन् हा मोलाचा सल्लाही

सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज याला ऑटोग्राफ दिला आहे. त्यानंतर गुरबाजने सोशल मिडीयावर फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ms dhoni and rahmanullah gurbaz
ms dhoni and rahmanullah gurbazSakal

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेने केकेआरला ७ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यानंतर सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाज याला ऑटोग्राफ दिला आहे.

रहमानुल्लाह गुरबाज हा कोलकत्ता संघाचा यष्टीरक्षक फलंदाज आहे, परंतु या हंगामात त्याला संघाकडून एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. केकेआर आणि सीएसकेचा सामना पार पडल्यानंतर गुरबाज आपली बॅट घेवून सीएसकेच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला होता. तेव्हा एमएस धोनीने त्याच्या बॅटवर आपली सही करुन दिली आहे. त्यानंतर गुरबाजने सोशल मिडीयावर फोटो शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ms dhoni and rahmanullah gurbaz
IPL 2024 Yash Thakur : हा दिवस तुझा असेल..! ; कर्णधार राहुलचा सल्ला स्फूर्तिदायी ठरला,यश ठाकूर

गुरबाजने आपल्या अधिकृत ट्विटर आकाऊंटवरुन धोनीसोबतचा फोटो शेअर करत म्हंटल आहे की, "भूतकाळाची चिंता करणे बंद करा, भविष्याचा विचार करणे थांबवा, फक्त हा क्षण जगा आणि आनंदित रहा, एमएस." त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मागील वर्षी गुरबाजने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते कि, "मला वाटत की सर्वांना माहित आहे माझा आदर्श कोण आहे, माझं प्रेरणास्थान कोण आहे आणि मी क्रिकेट खेळायला का सुरुवात केली. मी एमएस धोनीमुळे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मला धोनी खूप आवडतो. त्याच्याशी बोलायला आणि त्याला पाहायला मला खूप आवडतं."

आयपीएलच्या १७ व्या हंगामात केकेआरने गुरबाजऐवजी फिलिप साॅल्टला प्रधान्य दिले आहे. गुरबाजने आयपीएलमध्ये २०२३ मध्ये पदार्पण केले. त्याने ११ सामन्यांत २०.६४ च्या सरासरीने आणि १३३.५३ च्या स्ट्राईक रेटने २२७ धावा केल्या आहेत.

कोलकता नाईट रायडर्स आपले पुढचे ५ सामने ईडन गार्डन्सवर खेळणार आहे. ५ सामने घरच्या मैदानात असल्यामुळे संघाला त्याचा फायदा उठवावा लागणार आहे. पुढचा सामना संघ १४ एप्रिलला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com