IPL 2024 Points Table : चेन्नईविरुद्ध पराभवानंतर पांड्याला बसला मोठा धक्का! पॉइंट टेबलमध्ये गेली खाली...

IPL 2024 Points Table After MI vs CSK News : आयपीएल 2024 जसजशी पुढे जात आहे, तसतशी प्लेऑफची शर्यतही अधिक रोमांचक होत आहे. काल रात्री चेन्नई सुपर किंग्जने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला.
IPL 2024 Points Table After MI vs CSK News Marathi
IPL 2024 Points Table After MI vs CSK News Marathisakal

MI vs CSK IPL 2024 Points Table Latest Updated : आयपीएल 2024 जसजशी पुढे जात आहे, तसतशी प्लेऑफची शर्यतही अधिक रोमांचक होत आहे. काल रात्री चेन्नई सुपर किंग्जने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. या मोसमातील चेन्नईचा हा चौथा विजय आहे, तर मुंबईचा हा चौथा पराभव आहे.

IPL 2024 Points Table After MI vs CSK News Marathi
MI vs CSK IPL 2024 : धोनीच्या 3 षटकारांनी हादरलं वानखेडे..., कोण ठरला मुंबई इंडियन्सच्या पराभवाचा सर्वात मोठा व्हिलन?

चेन्नईच्या विजयानंतर गुणतालिकेत बदल झाला आहे. चौथ्या विजयाची नोंद करणाऱ्या चेन्नईला याचा फायदा झाला, तर मोसमातील चौथा सामना गमावणाऱ्या मुंबईला मोठा फटका बसला आहे. या विजयानंतर चेन्नई 8 गुण आणि +0.726 च्या नेट रन रेटने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर पराभूत मुंबई 4 गुण आणि -0.234 च्या नेट रन रेटने आठव्या स्थानावर घसरली आहे.

IPL 2024 Points Table After MI vs CSK News Marathi
MI vs CSK IPL 2024 : 'स्टंपच्या मागे त्या व्यक्तीने...' मुंबईच्या पराभवानंतर धोनीबद्दल काय म्हणाला हार्दिक पांड्या?

आतापर्यंतच्या हंगामात सर्वाधिक 5 विजय नोंदवणारा राजस्थान रॉयल्स 10 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. यानंतर कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज 8-8 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. कोलकाताचा नेट रन रेट +1.688 आहे. यानंतर सनराजर्स हैदराबाद 6 गुण आणि +0.344 च्या नेट रन रेटने चौथ्या स्थानावर आहे.

पाचव्या आणि सहाव्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स आहेत. लखनौचा नेट रन रेट +0.038 आहे आणि गुजरातचा निव्वळ रन रेट -0.637 आहे. यानंतर पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स 4-4 गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. तिन्ही संघांनी आतापर्यंत 6-6 सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ गुणतक्त्यात तळाच्या 10व्या स्थानावर आहे. बेंगळुरूने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी फक्त 1 जिंकला आहे, त्यानंतर त्यांचे 2 गुण आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com