IPL 2024 : डबल-हेडरनंतर Points Table मोठी उलथापालथ! मुंबईने घेतली झेप, RCB अडचणीत, CSK लाही धक्का

IPL 2024 Points Table Update News : आयपीएल 2024 मधील प्रत्येक सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहेत. कारण पराभूत संघासह अन्य संघांचेही मोठे नुकसान होत आहे.
IPL 2024 Points Table Update News Marathi
IPL 2024 Points Table Update News Marathisakal

IPL 2024 Points Table : आयपीएल 2024 मधील प्रत्येक सामन्यानंतर पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहेत. कारण पराभूत संघासह अन्य संघांचेही मोठे नुकसान होत आहे.

काल आयपीएल 2024 मध्ये डबल-हेडर सामने खेळले गेले. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला, या सामन्यात मुंबईने शानदार पुनरागमन केले आणि आयपीएल 2024 चा पहिला विजय नोंदवला. याशिवाय पॉइंट टेबलमध्ये दिल्लीची स्थिती सर्वात वाईट झाली आहे. पॉइंट टेबलमध्ये दिल्ली दहाव्या स्थानावर पोहोचली आहे.

याशिवाय रविवारी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आणखी एक सामना झाला. या सामन्यातही केएल राहुलचा संघ एलएसजीने बाजी मारली. या दोन्ही संघांच्या विजयाने गुणतालिकेत पूर्णपणे बदल झाला आहे. यामुळे सीएसके आणि आरसीबीला मोठा फटका बसला आहे. (IPL 2024 Points Table Update News)

IPL 2024 Points Table Update News Marathi
IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवानंतर शुभमन गिलने कोणाला धरले जबाबदार?

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पहिला विजय मिळवला आहे. मुंबईचे चाहते बऱ्याच दिवसांपासून विजयाची वाट पाहत होते. पहिल्या 3 सामन्यात एमआयच्या पराभवामुळे चाहते दु:खी झाले होते, परंतु आता मुंबईने पहिला विजय मिळवत गुणतालिकेत झेप घेतली आहे.

या सामन्यापूर्वी मुंबई पॉइंट टेबलमध्ये 10व्या स्थानावर होती, मात्र आता आठव्या स्थानावर पोहोचली आहे. त्यामुळे बेंगळुरूचे नुकसान झाले आहे. या सामन्यापूर्वी बंगळुरू आठव्या स्थानावर होते, परंतु आता ते 9व्या स्थानावर पोहोचले आहे.

याशिवाय मुंबईविरुद्धचा सामना हरण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स 9व्या स्थानावर होती, मात्र आता 10व्या स्थानावर गेला आहे. अशाप्रकारे दिल्लीच्या मुंबईविरुद्धच्या दारुण पराभवामुळे डीसीने स्वतःचेच नुकसान केले नाही तर आरसीबीलाही अडचणीत टाकले आहे.

IPL 2024 Points Table Update News Marathi
IPL 2024 : लखनौला मोठा धक्का! 'स्पीड गन' Mayank Yadav जखमी, एका ओव्हरनंतर अचानक...

या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघ 4 पैकी 2 विजयांसह तिसऱ्या स्थानावर होता. पण काल ​​लखनौने गुजरातला पराभूत केले आणि या आयपीएल हंगामातील तिसरा विजय नोंदवला आणि या विजयासह, ते पॉइंट टेबलमध्ये सीएसकेच्या वर आले आहेत. गुणतालिकेत चेन्नईची आता एका स्थानावर घसरण झाली आहे.

सीएसके आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर गेला आहे, तर लखनौ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स संघ सातव्या स्थानावर होता, आणि पराभवानंतरही सातव्या स्थानावर आहे, मात्र त्यांचा निव्वळ धावगती कमी झाला आहे. अशाप्रकारे रविवारी खेळल्या गेलेल्या डबल-हेडरमुळे गुणतालिकेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com