KKR vs RCB : बंगळूरसाठी आता चुकीला माफी नाही...! ताकदवर गंभीरच्या कोलकताविरुद्ध सामना

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru : प्रत्येकी सात साखळी सामन्यांचा अर्धा टप्पा पार झाला तरी यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ एक विजय मिळवून तळाच्या स्थानी असलेल्या बंगळूर संघासाठी अतिशय अंधूक आशा कायम आहे.
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru ipl 2024 News Marathi
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru ipl 2024 News Marathisakal

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru : प्रत्येकी सात साखळी सामन्यांचा अर्धा टप्पा पार झाला तरी यंदाच्या आयपीएलमध्ये केवळ एक विजय मिळवून तळाच्या स्थानी असलेल्या बंगळूर संघासाठी अतिशय अंधूक आशा कायम आहे. तरीही ज्योत पेटत ठेवायची असेल तर येथून पुढे त्यांच्यासाठी चुकीला माफी नसेल. अशा परिस्थिती त्यांना उद्या ताकदवान कोलकता संघाचा सामना करायचा आहे.

प्रत्येक आयपीएलमध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू संघात असतानाही एकदाही विजेतेपद न मिळालेल्या बंगळूरसाठी हा मोसमही वाया जाणार असे चित्र आहे. विराट कोहली सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप स्वतःकडे कायम ठेवून आहे. तरीही सात सामन्यांत सहा पराभव अशी स्थिती बंगळूरची झालेली आहे. यातील पाच पराभव सलग सामन्यांत झाले आहेत. आता आशा कायम ठेवायच्या असतील तर उद्यापासून सलग पाच सामने जिंकावे लागतील आणि त्यानंतर पुढचे टार्गेट निश्चित करावे लागेल.

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru ipl 2024 News Marathi
DC vs SRH : हेड की नटराजन... हैदराबादचा खरा हिरो कोण? 32 चेंडूत 89 धावा पडल्या 4 विकेट्स अन् 4.80 इकॉनॉमीवर भारी

स्वतः विराट कोहली, फाफ डुप्लेसी, दिनेश कार्तिक हवी तशी आक्रमक फलंदाजी करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात धावा करू शकतात; परंतु सूमार गोलंदाजी त्यांच्या मुळावर येत आहे. गेल्या सामन्यात त्यांच्याविरुद्ध आयपीएलमधील सर्वाधिक (तीन बाद २८७) धावसंख्या उभारली गेली. हैदराबाद संघातील फलंदाजांनी बंगळूरच्या गोलंदाजीची केलेली दैना त्यांच्या आत्मविश्वासाला तडा देणारी आहे.

त्यातच आज सामना असलेल्या कोलकता संघात एकापेक्षा एक तगडे फलंदाज आहेत. मुळात गोलंदाज असलेला; परंतु सलामीला खेळण्याची जबाबदारी देण्यात आलेला सुनील नारायण शतक करून आपली क्षमता सिद्ध करत आहे, त्यामुळे कोलकता संघातील कोणकोणत्या फलंदाजाला रोखणार, असा प्रश्न बंगळूर गोलंदाजीसमोर आहे.

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru ipl 2024 News Marathi
DC vs SHR : दिल्लीचेही दमदार प्रत्युत्तर मात्र त्रिमूर्तींमुळं हैदराबादचा शानदार विजय

श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग असे फलंदाज बंगळूरच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यास सज्ज आहेत, त्यामुळे उद्या बंगळूरचे गोलंदाज प्रथम गोलंदाजी करत असतील तर किती धावा देणार, हाच महत्त्वाचा प्रश्न असेल. कोलकता संघ गुणतक्त्यात सध्या दुसऱ्या क्रमांकावर असले तरी त्यांना सहापैकी चार सामने जिंकता आलेले आहेत, त्यामुळे तेसुद्धा विजयी गुणाबरोबर सरासरीही उंचावण्यासाठी अधिक प्रयत्नशील असतील.

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru ipl 2024 News Marathi
Abhishek Sharma DC vs SRH : कमनशिबी अभिषेक शर्मा! युवराजचा पठ्ठ्या IPL मध्ये मोठा इतिहास रचण्यापासून मुकला

या आयपीएलमध्ये बंगळूर आणि कोलकता यांच्यात २९ मार्च रोजीही सामना झाला होता. त्यात कोलकताने १९ चेंडू आणि सात विकेट राखून विजय मिळवला होता. बंगळूरने प्रथम फलंदाजीत १८२ ही बऱ्यापैकी चांगली धावसंख्या उभारली होती; परंतु तिचे संरक्षण त्यांचे गोलंदाज करू शकले नव्हते. त्यामुळे उद्याचा सामनाही अपवाद नसेल, असे आकडेवारीद्वारे स्पष्ट होत आहे.

विराट विरुद्ध स्टार्क

२९ मार्च रोजी झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने ८३ धावांची आक्रमक खेळी साकार केली होती, त्यात त्याने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा समाचार घेतला होता. उद्या पुन्हा एकदा या दोघांमधील द्वंद्व कसे रंगते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com