
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) ने आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच जेतेपद पटकावले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावांचा डोंगर उभा केला, तर पंजाब किंग्जला १८४ धावांवर रोखत विजय मिळवला.
सामन्याच्या समाप्तीनंतर कर्णधार विराट कोहली भावूक झाला आणि त्याने पत्नी अनुष्का शर्माला मिठी मारत आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. स्टेडियममधील प्रेक्षकही हा भावनिक क्षण पाहून भारावून गेले. अनुष्का ताल्या वाजवत आणि विराटला मिठी मारत या यशाबद्दल अभिनंदन करताना दिसली.