CSK vs RCB IPL 2025 Today Match Preview : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कात टाकली आहे. बंगळूर संघाने दहापैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आता बंगळूर संघाला आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावयाचा आहे. बंगळूरचा संघ या लढतीत विजय मिळवून प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
चेन्नई संघाचे आव्हान आधीच संपुष्टात आल्यामुळे आता त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली यांच्यामध्ये या मोसमातील अखेरचे द्वंद्व पाहण्याची संधी क्रिकेटप्रेमींना याप्रसंगी मिळणार आहे.