Gujarat Titans vs Delhi Capitals promises a fiery contest with Siraj and Starc leading the pace attack : गुजरात टायटन्स-दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आज आयपीएल साखळी फेरीची लढत रंगणार आहे. सध्या दिल्लीच्या संघाने पाच विजयांसह १० गुणांची कमाई केली असून, गुजरातच्या संघाने चार गुणांसह आठ गुणांची कमाई केली आहे. यामुळे या दोन संघांमध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व दिल्लीचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्क यांच्यामध्येही याप्रसंगी अटीतटीचा सामना रंगण्याची शक्यता आहे.