

IPL मध्ये असंख्य अविस्मरणीय क्षण घडतात, पण यावेळी चर्चेत कोणता खेळाडू नाही, तर एक फॅन आहे! राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यात धोनीच्या विकेटवर जोरदार प्रतिक्रिया देणारी आर्यप्रिया भुयान एका रात्रीत सोशल मीडियावर सुपरस्टार झाली.
गुवाहाटीची १९ वर्षीय विद्यार्थिनी असलेल्या आर्यप्रियाची प्रतिक्रिया थेट कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही क्षणांतच ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. चेन्नई सुपर किंग्जच्या समर्थकांमध्ये ती एक चर्चेचा विषय बनली आणि तिचे फोटो-मिम्स वेगाने शेअर होऊ लागले.