कोलकाता : आयपीएल २०२५ चा थरार सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी हा हंगाम खास असणार आहे, कारण नव्या नेतृत्वाखालील संघ, रोमांचक लिलावानंतरच्या नव्या संघ रचना आणि अत्यंत चुरशीच्या लढती रंगणार आहेत. मात्र, स्पर्धेच्या या पर्वाची सुरुवात एका भव्य, दिमाखदार आणि तडफदार उद्घाटन सोहळ्याने होणार आहे. कोलकाता येथील इडन गार्डन्सवर हा सोहळा रंगणार असून, बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रातील आघाडीचे कलाकार आपल्या अदाकारीने चाहत्यांचे मन जिंकणार आहेत. जगभरातील क्रिकेट चाहते याकडे लक्ष ठेवून आहेत.