IPL 2025 Qualifier 1: कोण मिळवणार अंतिम फेरीचा मान? पंजाब आणि बंगळूर संघात आज कडवी झुंज अपेक्षित

punjab kings vs royal challengers bengaluru : आयपीएल २०२५ मधील क्वालिफायर वनमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात थरारक लढत होणार आहे. विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार, पराभूत संघासाठी एलिमिनेटर विजेत्याशी सामना.
IPL 2025 Qualifier 1
IPL 2025 Qualifier 1sakal
Updated on

मुल्लानपूर (चंडीगड) : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम दोन संघ आज ‘क्वालिफायर वन’ लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पंजाब किंग्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यामध्ये मुल्लानपूर येथे ही लढत पार पडणार आहे. या लढतीतील विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल. या लढतीतील पराभूत संघाला एलिमिनेटर लढतीतील (मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स) विजेत्या संघाशी ‘क्वालिफायर टू’ लढतीत लढावे लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com