IPL 2025 SRH vs DC Match Preview with Playing 11: दिल्ली कॅपिटल्स-सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज आयपीएल साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. हैदराबादच्या संघाचे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. अर्थात यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेले नाही. दिल्लीच्या संघाचे आव्हान कायम आहे. दिल्ली संघाने १० सामन्यांमधून सहा सामन्यांमध्ये विजय संपादन केले आहेत. उर्वरित चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतरही त्यांना प्ले ऑफमध्ये पोहोचता येणार आहे, मात्र मागील दोन लढतींमध्ये दिल्लीचा पराभव झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर विजयपथावर येण्याचे लक्ष असणार आहे.