IPL Auction: धोनीच्या 'मिशन घरवापसी'त गड आला पण सिंह गेला!

IPL Auction 2022 Chennai Super Kings Bring Back Bravo and Uthappa but fail to back Faf Du Plessis
IPL Auction 2022 Chennai Super Kings Bring Back Bravo and Uthappa but fail to back Faf Du Plessisesakal

बंगळुरू: आयपीएलच्या मेगा लिलाव 2022 मध्ये (IPL Auction 2022) सर्वांची नजर ही दोन स्टार संघ चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्सवर आहे. या दोन्ही संघातील अनेक खेळाडू रिटेन केले गेलेले नाही. त्यामुळे हे संघ यातील किती खेळाडूंना पुन्हा संघात आणण्यात यशस्वी होतात हे पाहणे औत्सुक्याचे होते. एमएस धोनीच्या (MS Dhoni) सीएसकेने आपल्या स्टार खेळाडूंना पुन्हा संघात घेण्यासाठी लिलावात चांगलाच जोर लावला होता. धोनीच्या मिशन घरवापसी अंतर्गत चेन्नईला दोन जुने खेळाडू परत आपल्या कळपात आणण्यात यश आले. मात्र त्यांचा सिंह विराटच्या आरसीबीने आपल्या गोटात सामिल करून घेतला.

IPL Auction 2022 Chennai Super Kings Bring Back Bravo and Uthappa but fail to back Faf Du Plessis
ह्यू खाली कोसळल्यानंतर आयपीएल लिलाव प्रक्रियेत मोठा बदल

चेन्नई सुपर किंग्जने मेगा लिलावात आपल्या संघातील जुन्या खेळाडूंना परत आपल्या घरात आणण्यासाठी जोर लावला होता. मात्र त्यांच्या हातून फाफ ड्युप्लेसिस (Faf Du Plessis) सारखा तगडा फलंदाज आणि उत्तम फिल्डर निसटून गेला. त्याला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरने 7 कोटीला खरेदी केले. मात्र चेन्नईला ड्वेन ब्राव्हो आणि रॉबिन उथप्पा हे दोन खेळाडू परत मिळवण्यात यश आले. चेन्नईने रॉबिन उथप्पाला आपल्या गोटात खेचण्यात यश आले आहे. त्यानंतर चेन्नईचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होची देखील घरवापसी झाली.

चेन्नईने घरवापसीच्या मोहिमेत अजून एका अनुभवी खेळाडूचे नाव जोडले. अंबाती रायडूला देखील सीएसकेने पुन्हा खरेदी केले. त्याचबरोबर दीपक चहरसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादच्या संघर्षात उडी घेत चहरची किंमत 2 कोटीपवरून 14 कोटींवर नेली. अखेर चेन्नईने दीपक चहरला 14 कोटी रूपयाला खरेदी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com