IPL Auction : भारतीय गोलंदाजांची हवा; कृष्णाही झाला 'प्रसिद्ध' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prasidh krishna

IPL Auction : भारतीय गोलंदाजांची हवा; कृष्णाही झाला 'प्रसिद्ध'

IPL Auction 2022 : टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांना चांगली पसंती मिळते. मात्र आता गोलंदाजही आयपीएलसारख्या स्पर्धेत चांगली पसंती मिळवत आहेत. परदेशी गोलंदाजांना मागे टाकत भारतीय गोलंदाजांनी आयपीएलच्या मेगा लिलावात चांगलाच भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. दीपक चाहर, अक्षर पटेल यांनी कोटीच्या घरात जाऊन दुहेरी आकडा गाठला. त्यांच्या पाठोपाठ प्रसिद्ध कृष्णानेही विशेष छाप सोडली. राजस्थान रॉयल्सने 10 कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. याआधी चेन्नई सुपर किंग्जने दीपक चाहरसाठी 14 कोटी मोजले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं हर्षल पटेलला 10.75 कोटीत खरेदी केले.

हेही वाचा: IPL Auction : पगारवाढ असावी तर आरसीबीच्या हर्षल पटेल सारखी!

प्रसिद्ध कृष्णाची मूळ किंमत (बेस प्राईज) 1 कोटी होती. याआधी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसले होते. आगामी आयपीएल हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून मैदानात उतरेल. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी वेस्ट इंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेत प्रसिद्धनं लक्षवेधी कामगिरी केली होती. त्याने सर्वाधिक विकेट घेत सामनावीर पुरस्कार पटकावला होता. या कामगिरीचाही त्याला लिलावात फायदा झाला.

हेही वाचा: IPL Auction 2022: चहरच्या बोलीला सीएसकेचा फिनिशिंग टच; लावली विक्रमी बोली

Web Title: Ipl Auction 2022 Rajasthan Royals For Rs 10 Crore For Prasidh Krishna Indian Premier League 2022 Mega Auction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top