IPL 2023: स्वप्न बघा पूर्ण होतात! IPLने बदलले नशीब, चौकीदाराचा मुलगा ड्रीम11 मुळे झाला रातोरात करोडपती

49 रुपये गुंतवून जिंकले 2 कोटी रुपये अन्...
IPL 2023 dream 11
IPL 2023 dream 11

IPL 2023 dream 11 : आपल्या देशात क्रिकेटचं वेड लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत दिसून येते. तसेच सध्या आयपीएलची धूम सुरू आहे. जवळपास दोन महिने हे सामने चालणार आहेत. मात्र क्रिकेट सामन्या व्यतिरिक्त सध्या ड्रीम 11 मुळे काही चाहते चर्चेचा विषय बनले आहेत. ड्रीम 11 मुळे काहींचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.

स्वप्न बघा पूर्ण होतात...काही स्वप्न अशी असतात की, जी कायम स्मरणात राहतात. असेच एक स्वप्न समस्तीपुर जिल्ह्यातील वारिसनगर ब्लॉक परिसरातील किशोर गावात राहणारा मुकेश पासवानच्या स्मरणात कायम राहिल कारण तो एका रात्रीत करोडपती झाला आहे. ड्रीम 11 मध्ये 49 रुपये गुंतवून मुकेशने 2 कोटी रुपये जिंकले आहेत.

IPL 2023 dream 11
IPL 2023 : धोनीनं तंबी देताच सगळी कशी सुतासारखी सरळ; पाय रेषेच्या पडला आतच

मुकेश युट्यूबवर ड्रीम 11च्या विजेत्याबद्दल पाहत होता त्यामुळे त्याला पण खेळायची इच्छा झाली. 2017 मध्ये आम्ही खेळायला सुरुवात केली. त्यानंतर मुकेश ड्रीम 11 मध्ये पैसे टाकून टीम निवडायचा आणि नंबर 1 वर येण्याचा मार्ग शोधायचा. मात्र अनेक वर्षे मुकेशला यात यश मिळाले नाही. त्यानंतर मुकेशने गेम खेळणे बंद केले.

IPL 2023 dream 11
IPL 2023: मुंबई इंडियन्स विरुद्धच्या विजयानंतर CSKला मोठा धक्का! दीपक चहर ४-५ सामन्यातून बाहेर

परंतु जेव्हा परत यूट्यूबवर करोडो रुपये जिंकणाऱ्या लोकांचे व्हिडिओ पाहायचो, तेव्हा त्यालाही इच्छा व्हायची की आपण पण एक दिवशी या ड्रीम 11च्या माध्यमातून करोडो रुपये जिंकू. त्यानंतर त्याने पुन्हा खेळ सुरू केला. आयपीएल 2021 मध्ये त्याने 5 लाख रुपये जिंकले. 2022 मध्ये आम्ही 2 लाख रुपये जिंकले. त्यानंतर सतत प्रयत्न करत राहिले आणि 2023 मध्ये 2 कोटी रुपये जिंकले. मुकेशचे वडील दीपक पासवान समस्तीपूर जिल्ह्यातील वारिसनगर पोलिस स्टेशनमध्ये वॉचमन आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com