आयपीएलमध्ये फिक्सिंग? CBI कडून गुन्हा दाखल

साखळी सामन्यांच्या लढती अंतिम टप्प्यात असताना मॅच फिक्सिंगच्या वृत्ताने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
 IPL Match Fixing 2022
IPL Match Fixing 2022SAKAL

IPL 2022: आयपीएलच्या 15 व्या मोसमातील साखळी सामन्यांच्या लढती अंतिम टप्प्यात असताना मॅच फिक्सिंगच्या वृत्ताने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सीबीआयने तीन पंटर्सवर गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुट्सचा वापर करून हे तिघे जण फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.(IPL Match Fixing 2022)

सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या तिघांपैकी एक जण दिल्ली, तर दोघे हैदराबादमधील आहेत. सीबीआय अधिक दक्ष झाले असून त्यांनी देशभर चौकशीचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे.

 IPL Match Fixing 2022
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू Andrew Symondsचा कार अपघातात मृत्यू

पाकिस्तानकडून मिळणाऱ्या इनपुट्सचा आधार घेत काही वैयक्तिक जणांचे एक नेटवर्क आहे जे आयपीएलमधील सामन्यांच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी कार्यरत आहे, अशी माहिती सीबीआयला मिळाली. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दिलीप कुमार (दिल्ली), गुराम वासू आणि गुराम सतीश (हैदराबाद) यांची नावे आहेत. यांचे नेटवर्क २०१३ पासून कार्यरत आहे, सट्टेबाजीच्या नावाखाली लोकांना फसवण्याचेही धंदे त्यांच्याकडून करण्यात येत असल्याचे उल्लेख एफआयआरमध्ये आहेत.

या तिघांनी खोटी ओळखपत्रे तयार करून बॅंकेत खाती तयार केली आहेत आणि अज्ञात बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांनी ‘केवायसी’ केली आहे. बँकेत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये जन्माच्या तारखांमध्येही घोळ आहे; परंतु बँक अधिकाऱ्यांनी त्याची योग्य पडताळणी केली नसल्याचे, सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

 IPL Match Fixing 2022
20 व्या वर्षी 20 षटकार; मात्र व्यसनामुळे मातीमोल झाली क्रिकेट कारकिर्द

यंदाची आयपीएल २६ मार्चपासून सुरू झाली आहे. गुजरात आणि लखनौ असे दोन नवे संघ यंदापासून आहेत. या दोन नव्या संघांनी शानदार कामगिरी केली आहे.

बीसीसीआय आणि आयसीसीकडूनही फिक्सिंग रोखण्यासाठी अधिक दक्षता घेतली जात असली तरी अजूनही काही प्रमाणात अशा घटना क्रिकेटविश्वात घडत आहेत. झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रँडन टेलरने आपल्याला सामन्यांचे निकाल निश्चित करण्यासाठी भारतीय उद्योजकाने गळ घातली असल्याची कबुली त्याने दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com