अखेरच्या काही सामन्यात मुंबई इंडियन्स सोडणार का तळाचे स्थान... | IPL MI VS SRH | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL MI VS SRH Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad

अखेरच्या काही सामन्यात मुंबई इंडियन्स सोडणार का तळाचे स्थान...

IPL 2022 : सलग पाच पराभवांमुळे स्वतःच्याच वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्या हैदराबादच्या अंधुक आशा जिवंत ठेवण्यासाठी आज मुंबई इंडियन्सचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. मुंबई संघाकडे आता तळाचे स्थान मागे टाकायचे हे एकमेव ध्येय आहे.

वानखेडे स्टेडियमवर आज होणाऱ्या या सामन्याचा पहिल्या चार संघांच्या क्रमवारीत बदल करणार नाही. सलग पाच विजय आणि त्यानंतर सलग पाच पराभव असा स्वतःचा आलेख खाली आणणाऱ्या हैदराबादला उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे १४ गुण होऊ शकतील. मुळात या चौथ्या स्थानासाठी बंगळूरसह चार संघांची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे हैदरबादसाठी जिंकूनही काही फरक पडणार नाही.

हेही वाचा: DC vs PBKS ; दिल्लीने पंजाबला मात देत आरसीबीचे टेन्शन वाढवले

हैदराबाद संघात वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन हे दुखापत झालेले खेळाडू कोलकताविरुद्धच्या सामन्यात परतले होते. वेगवान गोलंदाज उमरान मलिकलाही पुन्हा लय सापडली, तरीही त्यांचा पराभव झाला होता.

विल्यम्सनची चूक

कोलकताविरुद्धच्या सामन्यात गोलंदाज वापरात केन विल्यमसन त्याच्याकडून चूक झाली. वॉशिंग्टन सुंदरला अखेरचे षटक देण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता आणि या षटकात आंद्रे रसेलने तीन षटकार मारून कोलकताची धावसंख्या भक्कम केली होती. मुळात विल्यम्सनचा फॉर्मही संघासाठी चिंतेचा ठरत आहे.

हेही वाचा: छा गए बापू! IPL इतिहासात अशी कामगिरी अक्षर पटेल चौथा गोलंदाज

मुंबई शेवटचे स्थान टाळणार ?

गमावण्यासारखे काहीच नसलेल्या मुंबईने गेल्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला होता, तरीही ते चेन्नईला गुणतक्त्यात मागे टाकू शकले नव्हते. अखेरचा क्रमांक टाळण्यासाठी मुंबई आणि चेन्नई यांच्यात चुरस आहे. स्पर्धा संपत असताना मुंबईचे गोलंदाज फॉर्मात येत आहेत. गेल्या सामन्यात त्यांनी चेन्नईचा डाव ९७ धावांत गुंडाळला होता. आता हैदराबादची फलंदाजी पाहता मुंबईचे गोलंदाज वर्चस्व राखतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Ipl Mi Vs Srh Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad Dream11 Prediction Rohit Sharma Tim David

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top