IPL Today Match: पंजाब पुढे राहुलला रोखण्याचे आव्हान

पुण्यातील आजच्या सामन्यात पंजाब संघाचा कस लागणार
ipl today match
ipl today matchSAKAL

IPL 2022 : पंजाब किंग्ज-लखनौ सुपर जायंटस्‌ यांच्यामध्ये आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये आयपीएल लढत रंगणार आहे. लखनौ सुपर जायंटस्‌ संघाचा कर्णधार के. एल. राहुलला रोखण्याचे आव्हान या वेळी पंजाब किंग्जच्या गोलंदाजांसमोर असणार आहे. राहुलने आठ लढतींमधून दोन शतकांसह ३६८ धावांचा पाऊस पाडला आहे.

लखनौ संघाकडे एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. राहुलसह क्विंटॉन डीकॉक (२२५ धावा), दीपक हूडा (१९३), आयुष बदोनी (१३४) हे फलंदाजही फॉर्ममध्ये आहेत. मनीष पांडेला आतापर्यंत फक्त ८८ धावाच करता आल्या आहेत. मनीषला मागील काही आयपीएल मोसमांमध्ये आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे आगामी काळ त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

लखनौ संघात अष्टपैलू खेळाडूंचीही कमतरता नाही. कृणाल पंड्याने ११२ धावा फटकावल्या असून त्याने सात फलंदाजही बाद केले आहेत. जेसन होल्डर व मार्कस स्टोयनीस या दोन अष्टपैलू खेळाडूंना अद्याप उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. दोघांनीही अधूनमधून चांगली कामगिरी केली आहे. अर्थात होल्डरने नऊ फलंदाज बाद करीत गोलंदाजीत चमक दाखवली आहे. त्यांच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. आवेश खानने लखनौ संघासाठी सर्वाधिक ११ बळी टिपले आहेत. फिरकी गोलंदाज रवी बिश्‍नोई याने ६; तर दुशमंता चमिरा याने ५ फलंदाज बाद केले आहेत. या तीन गोलंदाजांकडून लखनौ संघाला याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेल यात शंका नाही.

मयांकचा फॉर्म चिंतेचा विषय

पंजाबसाठी कर्णधार मयांक अगरवालचा फॉर्म चिंतेचा विषय असणार आहे. त्याला आतापर्यंत फक्त १३६ धावाच करता आल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. पंजाबसाठी शिखर धवन (३०२ धावा), लियाम लिव्हिंगस्टोन (२४५ धावा) या खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली आहे. भनुका राजपक्ष व जॉनी बेअरस्टो यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच कामगिरीत सातत्याची गरजही आहे.

चहर, रबाडावर मदार

पंजाबच्या गोलंदाजी विभागाची मदार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा व फिरकी गोलंदाज राहुल चहर यांच्यावर असणार आहे. रबाडा याने ९; तर चहर याने १० फलंदाज बाद केले आहेत. युवा डावखुरा फलंदाज अर्शदीप सिंगने फक्त ३ फलंदाज बाद केले असले, तरी त्याने दबावाखाली जबरदस्त गोलंदाजी करीत संघासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. ओडियन स्मिथ, ऋषी धवन यांना रबाडा, चहर व अर्शदीप यांना साथ द्यावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com