IPL 2023: एका पराभव अन् दोन्ही संघांच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात! हैदराबाद-कोलकता आज लढत

दोन्ही संघांना चौथ्या विजयाची प्रतीक्षा!
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders
Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders IPL 2023 : आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद-कोलकता नाईट रायडर्स या गुणतालिकेत खालच्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये लढत रंगणार आहे. दोन्ही संघांना याप्रसंगी चौथ्या विजयाची प्रतीक्षा असणार आहे. एका पराभवामुळे दोन्ही संघांच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders
Wrestlers Protest: जंतर मंतरवर 'मिड नाइट ड्रामा'; कुस्तीपटूंचा पोलिसांवर गंभीर आरोप, कुस्तीपटू विनेश फोगट रडली

हैदराबादच्या फलंदाजांना या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, राहुल त्रिपाठी व एडन मार्करम या प्रमुख फलंदाजांना आतापर्यंत चांगला खेळ करता आलेला नाही. हॅरी ब्रुक याने सुरुवातीच्या लढतीत शतक झळकावले, पण त्याव्यतिरिक्त त्याला फलंदाजीत चुणूक दाखवता आलेली नाही. काही लढतींमध्ये त्याला सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले होते, पण आता त्याला पुन्हा मधल्या फळीत फलंदाजी करावी लागणार आहे.

वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातून माघार घ्यावी लागली. याचा फटका हैदराबादला बसला आहे. मयांक मार्कंडे (१० विकेट), भुवनेश्‍वरकुमार (७ विकेट), टी. नटराजन (६ विकेट) यांच्याकडून समाधानकारक कामगिरी झाली आहे.

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders
IPL : मुंबईचा पुन्हा यशस्वी द्विशतकी पाठलाग

उमरान मलिकच्या गोलंदाजी वेगाबाबत चर्चा होते, पण यंदा त्याच्याकडून चांगली कामगिरी झालेली नाही. त्याच्या गोलंदाजीवर १०.३५ च्या सरासरीने धावांची लूट करण्यात येत आहे. तसेच त्याला फक्त पाचच फलंदाज बाद करता आले आहेत.

फिरकीपटूंना योग्य साथ मिळायला हवी

वरुण चक्रवर्ती (१३ विकेट), सुयश शर्मा (९ विकेट) या भारतीय फिरकीपटूंनी आतापर्यंत कोलकतासाठी प्रभावी कामगिरी केली आहे, पण त्यांना वेगवान गोलंदाजांची उत्तम साथ मिळालेली नाही.

सुनील नारायण या फिरकीपटूलाही यंदाच्या मोसमात सूर गवसलेला नाही. आंद्रे रस्सेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत.

तिन्ही क्षेत्रांत कामगिरी उंचवावी लागेल

गुजरातविरुद्धच्या लढतीत झालेल्या पराभवानंतर कोलकता संघाचा कर्णधार नितीश राणा म्हणाला, आम्हाला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये कामगिरी उंचवावी लागणार आहे. व्यंकटेश अय्यर (२९६ धावा), रिंकू सिंग (२७० धावा), नितीश राणा (२३३ धावा) यांनी अधूनमधून धावा केलेल्या आहेत. पण कोलकताचा संघ सांघिक कामगिरीत यश मिळवण्यात अपयशी ठरत आहे. जेसन रॉय व रहमानुल्लाह गुरबाज हे सलामीवीर चमक दाखवत आहेत, पण या दोघांपैकी एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com