Jason Roy ECB Contract : सबसे बड़ा रुपैया! जेसन रॉयने लीग क्रिकेटसाठी इंग्लंड बोर्डाचा करारावर मारली लाथ

Jason Roy ECB Contract
Jason Roy ECB Contractesakal

Jason Roy ECB Contract : इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या केंद्रीय करारावर लाथ मारण्याच्या तयारीत आहे. जेसनला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामात खेळण्यास उत्सुक आहे. हा हंगाम 13 जुलैपासून 30 जुलैपर्यंत होणार आहे. रॉय पाठोपाठ रीसे टॉप्ले देखील जेसन रॉयच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा हा निर्णय त्याच्या खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून तो कसा सावरतो यावर अवलंबून आहे.

Jason Roy ECB Contract
MS Dhoni IPL 2023 : तर मला कोणताही संघ खरेदी करणार नाही... धोनीचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

इंग्लंड क्रिकेट बोर्ड वार्षिक जवळपास 66,000 पाऊंड्स रूपये खेळाडूंना देते. इसीबी हे क्रिकेट जगतातील सर्वात जास्त रक्कम देणाऱ्या क्रिकेट संघटनांपैकी एक आहे. इसीबीने हॅरी ब्रुक, डेविड मलान, मॅथ्यू पॉट्स, जसन रॉय, टॉप्ले आणि डेव्हिड विली यांच्याशी देखील 2022 - 23 साठी हाच करार केला होता.

Jason Roy ECB Contract
Virat Kohli IPL 2023 : विराट कोहलीने इतिहास रचला! दणदणीत फॉलोअर्ससह ठरला आशियातील पहिला खेळाडू

मेजर लीग क्रिकेट ही 13 जुलैलापासून टेक्सास येथे सुरू होणार आहे. या स्पर्धेत आयपीएल आणि ऑस्ट्रेलियातील फ्रेंचायजींचा समावेश आहे. रॉय हा एल ए नाईट रायडर्स संघाकडून खेळण्याची शख्यता आहे. मात्र यासाठी त्याला इसीबीचा करार सोडावा लागणार आहे.

ही स्पर्धा आणि इंग्लंडची टी 20 ब्लास ही स्पर्धा क्लॅश होण्याची शक्यता आहे. जर मेजर लीग क्रिकेटचा विस्तार झाला तर त्याचा परिणाम भविष्यात इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेवर होणार आहे. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्ड हे करारबद्ध खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com