
Jasprit Bumrah Will Miss Early IPL Matches: आयपीएल सुरू होण्याआधीच पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या लढतींना मुकणार आहे. जसप्रीत बुमरा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून याप्रसंगी देण्यात आली.