IPL 2023 Jay Shah : प्लेऑफसाठी BCCIने घेतला मोठा निर्णय! जय शहा यांनी केली घोषणा

IPL 2023 Jay Shah
IPL 2023 Jay Shah

IPL 2023 Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल प्लेऑफमध्ये पर्यावरणपूरक पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. BCCI आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलसाठी 500 झाडे लावणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी ही घोषणा केली.

आयपीएलचा पहिला क्वालिफायर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळला गेला. जेव्हा सामना दाखवला जात होता, तेव्हा प्रेक्षकांना प्रत्येक डॉट बॉलवर झाडाचे चिन्ह दिसत होते. बीसीसीआयने पर्यावरण टिकून राहण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

IPL 2023 Jay Shah
MS Dhoni : मग आत्ताच ही डोकेदुखी कशाला? धोनीच्या वक्तव्याने खळबळ

आयपीएलमध्ये निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणीय जागरूकता पसरवण्यासाठी केले जात आहे हे काही नवीन नाही, आरसीबीने 2011 मध्ये हरित पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक संकल्पना सुरू केली ज्याला "ग्रीन गेम" असे म्हणतात. या अंतर्गत ते दरवर्षी आयपीएलमध्ये एका गेममध्ये हिरवी जर्सी खेळतात.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर एकूण 84 चेंडूत धावा झाल्या नाहीत. यामध्ये चेन्नईचे 34 तर गुजरातचे 54 फलंदाज खेळले. विजय-पराजय यातील फरक तसाच राहिला असला तरी या चेंडूंमुळे आता ४२ हजार बिया रोवल्या जातील ज्यांचे एक दिवस झाडात रूपांतर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com