
Sports Update : IPL 2025 जवळ येत असताना, Jio Hotstar ने प्रेक्षकसंख्या वाढवण्यासाठी मोठी योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Jio Hotstar टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) सोबत भागीदारी करण्याच्या तयारीत आहे. या नव्या योजनेअंतर्गत डेटा प्लानसोबतच IPL स्ट्रीमिंग सब्सक्रिप्शन देण्याचा विचार केला जात आहे. यामुळे लाखो क्रिकेटप्रेमींना IPL सामने सहज पाहता येणार आहेत. 1 बिलियन व्ह्यूजचे लक्ष्य ठेवत, Jio Hotstar IPL 2025 चा आनंद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहे.