शेवटच्या काही सामन्यासाठी KKRने घेतला मोठा निर्णय! नुकतेच 39 चेंडूत शतक ठोकणाऱ्या खेळाडूला घेतले संघात

लिटन दास IPL 2023 मधून बाहेर! KKRला मिळाला धाकड फलंदाज
Johnson Charles joins Kolkata Knight Riders
Johnson Charles joins Kolkata Knight Riders

Kolkata Knight Riders IPL 2023 : कोलकाता नाईट रायडर्स संघाला अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासचा पर्याय मिळाला आहे. लिटन दासच्या जागी केकेआर संघाने त्याच्या बदलीची घोषणा केली आहे.

त्याच्या जागी केकेआरने वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सचा समावेश केला आहे. 34 वर्षीय जॉन्सनने अलीकडेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बॅटने कहर केला होता. चार्ल्सने या टी-20 सामन्यात अवघ्या 39 चेंडूत शतक झळकावले होते.

Johnson Charles joins Kolkata Knight Riders
IPL 2023: 'हे शेवटचे वर्ष का...', धोनीच्या निवृत्तीच्या प्रश्नावर वीरेंद्र सेहवाग संतापला

कौटुंबिक कारणांमुळे लिटन दास गेल्या आठवड्यात KKR सोडून बांगलादेशला परतला होता. केकेआरने गतवर्षी लिटन दासला त्याच्या मूळ किमतीत 50 लाख रुपयांना खरेदी केले होते. केकेआरने त्याला केवळ एका सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले आणि त्यानंतर त्याला बाहेर ठेवले.

दुसरीकडे, जर आपण जॉन्सन चार्ल्सबद्दल बोललो तर तो वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 41 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 971 धावा केल्या आहेत. त्याने एकूण 224 टी-20 सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या नावावर 5600 पेक्षा जास्त धावा आहेत. तो केकेआरमध्ये 50 लाखांच्या मूळ किमतीत सामील होणार आहे.

Johnson Charles joins Kolkata Knight Riders
IPL 2023 Points Table: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत झाली रंजक! 'या' संघाचे वाढले टेन्शन

पॉइंट टेबलवर नजर टाकली तर केकेआरची स्थिती फारशी चांगली दिसत नाही. नितीश राणाच्या नेतृत्वाखालील संघाला नऊपैकी केवळ तीनच सामने जिंकता आले आहेत. त्यांची अवस्था दिल्ली कॅपिटल्ससारखीच आहे.

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना उर्वरित पाचही सामने जिंकावे लागतील. अन्यथा उर्वरित संघांच्या कामगिरीच्या आधारे टॉप-4मध्ये स्थान मिळवण्यासाठी मार्ग शोधावा लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com