KKR च्या मॅनेजमेंटची सिलेक्शन मध्ये लुडबुड; श्रेयस अय्यर संतापला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 KKR captain Shreyas questions CEO Venki Masur involved in team selection

KKR च्या मॅनेजमेंटची सिलेक्शन मध्ये लुडबुड; श्रेयस अय्यर संतापला

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 56 वा सामना काल नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात KKR संघाने 52 धावांनी मोठा विजय मिळवला. MI विरुद्धच्या या सामन्यात KKRच्या संघाने एक-दोन नव्हे तर एकूण पाच बदल केले होते. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने काही गोष्टी सांगितल्या ज्या खूप आश्चर्यकारक होत्या. खरे तर कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह संघ मैदानात उतरणार, हे कर्णधार आणि प्रशिक्षक परिस्थितीनुसार ठरवतात. पण केकेआर संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार हे संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर ठरवता, याचा खुलासा खुद्द श्रेयस अय्यरने केला आहे. (KKR CEO Venki Masur involved in team selection shreyas iyer raises questions)

हेही वाचा: गांगुलीची पत्नी होणार भाजप खासदार? अमित शाह यांच्या डिनरनंतर चर्चांना जोर

एमआय विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनबद्दल बराच वेळ विचार झाला. त्यावर श्रेयस अय्यर म्हणाला की, या बैठकीत कोचशिवाय संघाचे सीईओही उपस्थित होते. यादरम्यान आज कोणते खेळाडू मैदानात उतरणार आणि कोणाला बाहेरचा रस्ता दाखवायचा हे ठरले. आजच्या सामन्यात या संधी खेळाडू मिळणार नाही. अशी माहिती प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम यांनी दिली. त्यानंतर या निर्णयाशी सर्व खेळाडू सहमत असल्याचे दिसून आले. आता अशा स्थितीत मला प्रश्न पडला आहे की, संघ निवडीत सीईओचे काम काय? वेंकी म्हैसूरला क्रिकेटचा अनुभव आहे असे नाही. कालचा सामन्यात KKR चा संघ हरला असता तर कोणाची जबाबदारी होते ? कारण सामन्यात कोणत्या खेळाडूसह मैदानात उतरायचे हे फक्त कर्णधार आणि प्रशिक्षकच चांगले समजू शकतात. दुसरीकडे, जर सीईओने संघ निवडीत हस्तक्षेप केला तर त्याचा संघाच्या कामगिरीवरही वाईट परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: KKR vs MI : मुंबई काही तळ सोडेना! केकेआरने पोहोचली सातव्या स्थानावर

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईचा 52 धावांनी पराभव करत आपला पाचवा सामना जिंकला. केकेआरचे 165 धावांचे आव्हान पार करताना मुंबईचा संघ 113 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला.

Web Title: Kkr Ceo Venki Masur Involved In Team Selection Shreyas Iyer Raises Questions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top