कोलकाता पहिल्या पराभवाचा बदला घेणार? राजस्थानसोबत आज सामना| IPL 2022 Today Match | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 Today Match

कोलकाता पहिल्या पराभवाचा बदला घेणार? राजस्थानसोबत आज सामना

IPL 2022 Today Match : आयपीएलमध्ये 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स दुसऱ्यांदा आमने-सामने येत आहे. दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. याआधीच्या सामन्यात राजस्थानने कोलकातावर 7 धावांनी विजय मिळवला होता. आयपीएलमध्ये दोन्ही संघ एकूण 26 वेळा आमने सामने आले आहे.

हेही वाचा: जडेजाच नव्हे, या १० खेळाडूंनाही IPL मध्येअर्ध्यातच सोडावे लागले कर्णधारपद

कोलकाता आणि राजस्थान यांच्यात नेहमीच कांटे की टक्कर झाली आहे. असेच काहीसे या हंगामातील पहिल्या सामन्यातही पाहायला मिळाले आहे. जर आपण हेड टू हेड रेकॉर्डवर नजर टाकली तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहे, त्यापैकी 13 केकेआरने जिंकले आहेत आणि 12 रॉयल्सने जिंकले आहे. अशा स्थितीत केकेआर पुढे आहे पण सध्याच्या कामगिरीनुसार सद्या तर राजस्थान वर आहे.

हेही वाचा: लाईव्ह मॅचमध्ये मुकेश चौधरीवर का भडकला धोनी, नेमकं झालं तरी काय?

पॉइंट टेबलमध्ये 9 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह राजस्थान सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर केकेआरला गेल्या पाच सामन्यांत सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाता 6 पराभव आणि 3 विजयानंतर 9 पैकी 6 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत आज जर संघ हरला तर त्याच्या प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात येऊ शकतात.

Web Title: Kkr Vs Rr Record Kolkata Knight Riders Rajasthan Royals Ipl 2022 Today Match

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top