IPL 2022 : कोलकताला राजस्थान विरुद्ध 'रॉयल' विजयाची आशा KKR vs RR Today Match | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 | KKR vs RR Today Match

IPL 2022: कोलकताला राजस्थान विरुद्ध 'रॉयल' विजयाची आशा

IPL 2022 : राजस्थान रॉयल्स व कोलकता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये आयपीएलमधील लढत रंगणार आहे. यावेळी उभय संघ चौथ्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसतील. संजू सॅमसन व श्रेयस अय्यर या दोघांच्या नेतृत्वाचाही यावेळी कस लागेल हे निश्‍चित.(KKR vs RR Today Match)

कोलकता नाईट रायडर्सची यंदाच्या मोसमातील सुरुवात छान झाली होती. पहिल्या चारपैकी तीन लढतींमध्ये या संघाने विजय मिळवला होता. चेन्नई, पंजाब व मुंबई या संघाला पराभूत करणाऱ्या कोलकता नाईट रायडर्सला फक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून हार सहन करावी लागली होती. पण मागील दोन लढतींमध्ये कोलकता नाईट रायडर्सला दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघाकडून हार सहन करावी लागली आहे.(IPL 2022)

रसेल, उमेशवर मदार

कोलकता नाईट रायडर्ससाठी आंद्रे रसेलने ६ सामन्यांमधून ५९.६७ च्या सरासरीने व १७९ च्या स्ट्राईक रेटने १७९ धावा फटकावल्या आहेत. तसेच ५ फलंदाजांनाही त्याने बाद केले आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवने १० फलंदाज बाद केले आहेत.

Web Title: Kkr Vs Rr Who Will Win Today Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..