KL Rahul IPL 2023 : लोकांना वाटतं की त्यांच्याकडे काहीही... केएल राहुल ट्रोलर्सवर भडकला

KL Rahul IPL 2023
KL Rahul IPL 2023esakal

KL Rahul IPL 2023 : केएल राहुल सध्या लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधारपद भूषवत नाहीये. तो दुखापतीमुळे आयपीएलच्या 16 व्या हंगामातून बाहेर पडला असून त्याने आपल्या मांडीच्या स्नायूवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. दरम्यान सध्या ब्रेकवर असलेला केएल राहुल हा युट्यूच्या द रणवीर शो या चॅनशील गप्पा मारत होता. यावेळी केएल राहुल पहिल्यांदाच त्यांच्याविरूद्ध सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत उघडपणे बोलला. राहुल म्हणाला की, जरी काही क्रिकेटपटू ट्रॉलर्सना जास्त भाव देत नसले तरी काहीवेळा याचा आमच्यावरही परिणाम होतो.

KL Rahul IPL 2023
Ricky Ponting IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्समध्ये बदलाचे वारे; पॉटिंगची होणार सुट्टी, 'या' भारतीयाचे नाव चर्चेत

द रणवीर शो दरम्यान राहुल ट्रॉलर्सबाबत बोलताना म्हणाला की, 'काही गोष्टी काहीवेळा माझ्यावरही परिणाम करतात. माझ्यासह इतर खेळाडूंनाही याचा अनुभव येतो. खेळाडूला ज्यावेळी खऱ्या अर्थाने समर्थनाची गरज असते त्यावेळी लोकांना वाटते की त्यांच्याकडे काहीही कमेंट करण्याची ताकद आहे त्यामुळे ते काहीही बोलतात. फक्त एकदा तो व्यक्ती कोणत्या स्थितीतून जात आहे हे एकदा पहा.'

2022 चा वर्ल्डकप झाल्यापासून केएल राहुल हा ट्रॉलर्सच्या निशाण्यावर असतो. एवढेच नाही तर माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसादने देखील त्याच्यावर खराब कामगिरीनंतर टीका केली होती. राहुलला 2022 मध्ये एकाही सामन्यात शतक खेळी करण्यात यश आले नव्हते. त्याला वनडे, टी 20 आणि कसोटी संघाचे आपले उपकर्णधारपदही गमवावे लागले होते. राहुलने मान्य केले की मी माझे 200 टक्के प्रयत्न करत होतो. मात्र परिस्थिती माझ्या बाजूने नव्हती.

KL Rahul IPL 2023
IPL 2023 Play Off : पंजाब आठव्या स्थानावर तरी आरसीबी इतकीच संधी कशी... कोणाला किती संधी एका क्लिकवर

राहुल म्हणाला की, 'आमच्यापैकी कोणालाही खराब कामगिरी करण्याची इच्छा नसते. हे आमचं आयुष्य आहे. हेच आम्ही सर्व करत आलो आहोत. मला क्रिकेटशिवाय दुसरं काही येत नाही. ही एकच गोष्ट आहे जी मी करू शकतो. त्यामुळे कोणी मी माझ्या खेळाबद्दल गंभीर नाही असं कसं म्हणू शकतं. मी जसं सांगितलं की आपण कष्ट करू शकतो. मी कष्ट करतोय मात्र निकाल माझ्या मनासारखा लागत नाहीये.'

केएल राहुलवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता तो बंगळुरू येथील एनसीएमध्ये आपले रिहॅबिलिटेशन सुरू करण्यास सज्ज झाला आहे. केएल राहुलचा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपपूर्वी संघात परतण्याचा प्रयत्न आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com