KL राहुलची खवय्येगिरी; उथप्पाच्या बायकोची कमेंट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Robin Uthappa Wife On KL Rahul

KL राहुलची खवय्येगिरी; उथप्पाच्या बायकोची कमेंट चर्चेत

आयपीएल 2022 च्या हंगामात केएल राहुल (IPL 2022 KL Rahul) च्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजाएंट्स (Lucknow Super Giants) दमदार कामगिरी करत आहे. ज्यापद्धतीने लखनौ खेळत आहे त्यानुसार ते प्ले ऑफचे तिकीट नक्की मिळवतील, असे बोलले जात आहे. आतापर्यंत लखनौनं 5 सामन्यात 3 सामने जिंकले आहेत. पण मागील सामन्यात लखनौच्या संघाला राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतरही संघातील खेळाडूंचा उत्साह कमी झालेला नाही. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध 16 एप्रिलला भिडण्यापूर्वी संघातील खेळाडू धम्माल करताना दिसताहेत.

लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास फोटो शेअर केलाय. नाईट आउट या कॅप्शनखाली त्याने जो फोटो शेअर केलाय त्यात तो पाणीपुरीचा अस्वाद घेताना दिसतोय. त्याच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. यातील एक कमेंटची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार बॅटर रॉबिन उथप्पा याची पत्नी (Robin Uthappa Wife) शितल गौतम (Sheethal Goutham) हिने केलेली कमेंट चर्चेचा विषय ठरतीये. शीतलने पाणीपुरीची टेस्ट कशीये? असा प्रश्न विचारला आहे. राहुलनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रॉबिन उथप्पाची पत्नी शितल सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. यापूर्वी तिने महेंद्रसिंग धोनी, साक्षी धोनी आणि उथप्पासोबतचा एक फोटो शेअर केला होता. याचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. याशिवाय रॉबिन उथप्पाने बायकोसोबतच्या डान्सचा एक व्हिडिओही चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

Web Title: Kl Rahul Shared The Photo Uthappas Wife Sheethal Goutham Asked Question Viral News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top