MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MI vs KKR
Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indian In Wankhede Stadiumesakal

Kolkata Knight Riders Defeat Mumbai Indian In Wankhede Stadium After 12 Years IPL 2024 : शाहरूख खानला वानखेडे नावाचं वावडं आहे. या नावासोबतचा शाहरूख खानचा इतिहास हा फार काही चांगला नाही. 12 वर्षापूर्वी याच वानखेडेवर सुरक्षा कर्मचाऱ्यासोबत झालेल्या वादामुळं त्याला बंदीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आर्यन खान प्रकरणातही याच आडवामुळं शाहरूख खानची झोप उडाली होती.

त्यात शाहरूख खानचा केकेआर संघाचं देखील वानखेडेशी वावडं होतं. कारण 2012 नंतर केकेआरला वानखेडे काही सर करता आलं नव्हतं. वानखेडेवर केकेआरने तब्बल 10 सामने खेळले त्यात फक्त एक विजय मिळवता आला होता.

मात्र आता 12 वर्षानंतर म्हणजे 2012 नंतर केकेआर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या बालेकिल्ल्यात जिंकली. हा केकेआरसाठी अन् शाहरूखसाठी देखील मोठा दिलासा ठरला.

MI vs KKR
IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर केकेआरची वानखेडेवर सुरूवात काही चांगली झाली नव्हती. केकेआरच्या निम्म्या संघाने 57 रन्समध्ये पॅव्हेलन गाठलं होतं. नुवान तुषारानं केकेआरचे तीन बॅटर आऊट करत खिंडार पाडलं. त्यानंतर बुमराह अन् हार्दिकनं केकेआरला अजून दोन धक्के दिले. केकेआरच रथी महारथी एका पाठोपाठ एक मैदान सोडत होते.

मात्र केकेआरची धावगती चांगली राखण्याचा प्रयत्न केला. हीच काय ती पॉवर प्लेमधील त्यांची जमेची बाजू होती. पॉवर प्लेनंतर व्यंकटेश अय्यर आणि इम्पॅक प्लेअर म्हणून आलेल्या मनिष पांडे यांनी डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 83 रन्सची भागीदारी रचत संघाला सन्मानजनक स्कोअर उभारून दिला.

दरम्यान, पांडेने 42 रन्स करून अय्यरची साथ सोडली. त्यानंतर मुंबईनं केकेआरची शेपूट गुंडाळण्यास सुरूवात केली. बुमराहनं स्लॉग ओव्हरमध्ये विकेट्स घेण्याचा धडाका लावला. मात्र अय्यरनं एका बाजूनं धावा करणं सुरू ठेवलं. त्यानं 42 बॉलमध्ये 70 धावा करून संघाला 169 धवापर्यंत पोहचवलं.

MI vs KKR
T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

मुंबई ज्यावेळी 170 धावांच आव्हान घेऊन मैदानात उतरली त्यावेळी मुंबईची सुरूवात देखील खराब झाली. इशान 13 रोहित 11 रन्स करून बाद झाला. सूर्या सेट होण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वरूण चक्रवर्ती अन् सुनिल नारायणनं बघता बघता मुंबईची अवस्था 6 बाद 71 रन्स अशी करून टाकली.

मुंबईच्या पराभवाची फक्त फॉरमॅलिटी राहिली असल्याचं वाटू लागलं. मात्र सूर्यानं वर्ल्डकपसाठीचा चांगला सराव करून घेतला. तो बॅटिंग करत असताना मुंबईनं सामना जवळ आणला. त्याला साथ देणारा टीम डेव्हिड देखील चांगली झुंज देत होता. त्यामुळं केकेआरची धाकधूक वाढली होती.

अखेर आंद्रे रसेल केकेआरच्या मदतीला धावून आला. त्यानं सूर्याला 56 रन्सवर बाद केलं. रसेलला साथ देण्यासाठी आता मिचेल स्टार्क आला होता. त्यानं 19 व्या षटकात आधी 24 रन्सवर खेळणाऱ्या टीम डेव्हिडला आऊट केलं.

पाठोपाठ पियुष चावलाची शिकार केली अन् षटकाच्या पाचव्या चेंडूवर कॉट्झीचा त्रिफळा उडवत केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अशा प्रकारे केकेआरनं तब्बल 12 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवला. याचबरोबर मुंबईची प्ले ऑफची आशा पूर्णपणे संपुष्टात आली.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com